मनोरंजनसृष्टीत, खास करून टेलिव्हिजन मालिका क्षेत्रात, अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येताहेत. सोनी मराठी वाहिनीवर आता एक नवीन मालिका रुजू होतेय ज्यातील नायिका परम रामभक्त आहे. 'वैदेही - शतजन्माचे आपुले नाते’ असे या मालिकेचे नाव असून येत्या १६ ऑगस्टपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अभिनेत्री सायली देवधर हिची मुख्य भूमिका असलेली 'वैदेही' - शतजन्माचे आपुले नाते या मालिकेत मनुष्याच्या चांगुलपणावर भर देत प्रत्येकाने समाजासाठी उपयुक्त राहावे हे नमूद करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
देव दिखाव्याला नाही श्रद्धेला पावतो, असं मानणाऱ्या या मालिकेत वैदेही ही रामाची निस्सीम भक्त आहे. तिच्या चांगल्या स्वभावामुळे ती दुसऱ्यांना नेहमी मदत करत असते. सालस आणि समंजस स्वभावाची वैदेही आपल्या कुटुंबासाठी, आपल्या बहिणींसाठी नेहमी खंबीरपणे उभी आहे आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी संभाळतेय. या मालिकेत अभिनेत्री पल्लवी अजय पाटील आणि तृष्णा चंद्रात्रे यासुद्धा दिसणार आहेत. सोनी मराठी वाहिनीवरील ही मालिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास मालिकेच्या निर्मात्यांना आहे.
हेही वाचा - कपिल शर्माच्या कॉमेडी शोचा हा सुपरस्टार असणार पहिला पाहुणा, शोची तारीख जाहीर