मुंबई - झी मराठीवरील ‘अग्गबाई सूनबाई’ या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. ह्या मालिकेत शुभ्राचं रूप खूप वेगळं आहे, ही शुभ्रा थोडी बुजरी आहे, ती एका मुलाची आई आहे, तिला मुलाची काळजी आहे. मी करते ते बरोबर की नाही हा भाव तिच्या मनात सतत डोकावतो. या मालिकेत आसावरीने घराची सूत्र हाती घेतली असून, सोहम राईट हॅन्ड आहे. अभिजीत राजेंनी घरची जबाबदारी स्वीकारली आहे. दोघांमध्ये बाबा आणि मुलीचं नातं आहे. बबडूची (मुलाची) पूर्ण जबाबदारी असल्याने ती घरातच आहे, ती अतिशय प्रोटेक्टिव्ह आहे, शुभ्रा अशी आहे. मुलाच्या म्हणजेच बबडूच्या जन्माच्यावेळेस निर्माण झालेली गुंतागुंत आणि सोहम सोबत संसार टिकवण्यासाठीची तिची धडपड यात तिला कसरत करावी लागत आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी सोहम आणि सुझेनच प्रेमप्रकरण शुभ्रासमोर आलं. या प्रकरणाचा शुभ्राला मोठा धक्का बसल्याने ती आत्महत्या करण्याचा निर्णय घेते. त्याचवेळेस तिच्यासमोर अनुराग गोखले नावाची व्यक्ती येते, कोण आहे हा अनुराग? हे लवकरच प्रेक्षकांसमोर येईल. या निमित्ताने ‘चिन्मय उदगीरकर’ पुन्हा एकदा झी मराठी वर पुनरागमन करतोय. याआधी चिन्मय झी मराठीवरील 'नांदा सौख्य भरे' या मालिकेतून प्रेक्षकांसमोर आला होता.