मुंबई - गायिका नेहा कक्कड नेहमीच सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करुन धमाल उडवत असते. आता तिने शेअर केलेला व्हिडिओ भरपूर चर्चेत आहे. तिने स्वतःच गायलेल्या 'दिलबर' या गाण्यावर चक्क बॅले डान्स करीत ठुमके लावले आहेत. या गाण्याला चाहत्यांसह बॉलिवूडमधील अनेकांनी पसंती दाखवली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
आपल्या टॅलेंटने बॉलिवूडमध्ये स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या नेहाने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केलाय. याचे कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, 'जेव्हा मी स्वतःच्याच गाण्यावर डान्स करते'. यात ती 'दिलबर' या गाण्यावर थिरकली आहे.व्हायरल झालेला हा व्हिडिओ चाहत्यांना भावला आहे.
नेहाच्या पोस्टवर कॉमेंट करताना तिचा भाऊ टोनी कक्कड म्हणतो, ,ती हजारोमध्ये एक आहे,. या शिवाय सोनू कक्कडने 'हे फक्त तूच करु शकतेस', असे म्हटलंय.
लोकप्रिय गायिका नेहा कक्कडने हिंदीसह पंजाबी भाषेतही गायन केले आहे. दिल्लीची राहणारी नेहा पूर्वी देवीच्या जागरणामध्ये गायन करीत असे. २००६ मध्ये ती 'इंडियन आयडॉल'ची स्पर्धक होती. विशेष म्हणजे २०१९ च्या 'इंडियन आयडॉल'ची ती होस्ट होती.