मुंबई - इंडियन आयडॉल हा प्रेक्षकांची पसंती मिळविलेला म्युझिक रियालिटी शो आहे, ज्याचे यावर्षी १२ वे पर्व सुरु आहे. बॉलिवूडचे कलाकार असोत वा सामान्य माणूस, प्रत्येकजण या कार्यक्रमाचा प्रचंड चाहता आहे. इंडियन आयडॉलने देशभरातील संगीत रसिकांच्या हृदयात एक विशेष स्थान मिळविले आहे. या कार्यक्रमात विशेष सांगीतिक भाग प्रस्तुत केले जातात आणि त्यासंबंधित बॉलिवूडमधील प्रतिष्ठित व्यक्तींना पाहुणे म्हणून बोलावले जाते. या विकेंडला इंडियन आयडॉल १२ च्या मंचावर ‘ऋषी कपूर स्पेशल’ सादर होत असून त्यासाठी ऋषी कपूर यांच्या पत्नी आणि अभिनेत्री नीतू कपूर यांची हजेरी लावली.
'इंडियन आयडॉल १२'च्या मंचावर नीतू कपूर इंडियन आयडॉल चे टॉप १० स्पर्धक ऋषी कपूरची सदाहरित गाणी सादर करणार आहेत. ऋषी कपूर हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला चॉकलेट बॉय होते आणि त्यांचे स्टारपण साजरे करण्यासाठी स्पर्धक त्यांची गाणी गाताना दिसणार आहेत. या भागाला खास बनवण्यासाठी त्यांची पत्नी नीतू कपूर सामील होणार आहेत. यावेळी ऋषी कपूर यांची आठवण सर्वांनाच आली आणि त्यांच्याबाबतचे माहिती नसलेले किस्से ऐकायला मिळणार आहेत. त्यांची अर्धांगिनी आणि सहकलाकार नीतू कपूर यांनी त्यांच्या करियर मधील, एकत्र शूटिंग करतानाचे आणि एकंदरीतच कपूर खानदानाबद्दलचे अनेक किस्से सांगितले.
'इंडियन आयडॉल १२'च्या मंचावर नीतू कपूर सर्वच स्पर्धकांना नीतू कपूर यांनी प्रोत्साहित केले आणि शोच्या जजेसनी नीतू मॅमसोबत खेळीमेळीत संवाद साधला. इंडियन आयडॉल सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर दर शनिवारी आणि रविवारी रात्री प्रसारित होतो.
'इंडियन आयडॉल १२'च्या मंचावर नीतू कपूर हेही वाचा - कोण होणार करोडपती' ला मिस्ड कॉल म्हणजे एक करोडचा कॉल!