बिग बॉस मधील निष्कासन प्रक्रियेमध्ये सर्वात कमी वोट्स मिळालेल्या सदस्याला घराबाहेर जावे लागते. प्रेक्षकांना माहीतच आहे की आता बिग बॉसच्या घरामध्ये नॉमिनेशन प्रक्रिया सुरु असते आणि या घरामधून आता दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर जाणे अनिवार्य असते. या आठवड्यातील सर्वात कमी वोट्स मिळालेली ‘वाईल्ड कार्ड एन्ट्री’ सदस्य नीथा शेट्टी साळवी (Neetha Shetty Salavi)हिला घराबाहेर पडावे लागले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
बिग बॉस मराठीच्या (BBM-3)घरामध्ये बालदिन साजरा झाला. यानिमित कलर्स मराठी परिवरातील दोन चिमुकल्या सदस्यांनी सदस्यांची भेट घेतली. जय जय स्वामी समर्थ मालिकेतील कृष्णप्पा आणि सोमनाथ या दोघांनी घरातील सदस्यांसोबत बरीच धम्माल मस्ती केली. लहानपणीच्या गोड आठवणी सदस्यांनी सांगितल्या. तर सदस्यांच्या धम्माल नकलांनी रंगली बिग बॉसची चावडी. याचसोबत बिग बॉसच्या चावडीमध्ये वूट द्वारे आलेल्या फॅन्सची ‘चुगली चुगली बूथ’ द्वारे मीनल ची चुगली केली.
दादूस, विकास आणि विशाल यांनी बिग बॉसच्या चावडीमध्ये वूट द्वारे आलेल्या प्रेक्षकांची अतरंगी डिमांड पूर्ण केली. या आठवड्यात नॉमिनेशनमध्ये आलेल्या सदस्यांमध्ये जय, विशाल, आणि दादूस सेफ आहेत, असे महेश मांजरेकर यांनी आधीच जाहीर केले होते. त्यामुळे नीथा, सोनाली, उत्कर्ष आणि विकास या चौघां जणांमधून कोणाला घराबाहेर जावे लागेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक होते. नीथा आणि सोनाली हे दोन सदस्य डेंजर झोनमध्ये आले असे महेश मांजरेकरांनी सांगितले. नीथा शेट्टी साळवी हिला या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले.
बिग बॉस मराठी सिझन ३ कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होतो.
हेही वाचा - भूषण प्रधान आणि प्रार्थना बेहरे अभिनित ‘अजिंक्य’ चित्रपटाचा ट्रेलर झाला प्रदर्शित!