लॉस एंजेलिस - "चार्ली एंजल्स" आणि "अलादीन" या चित्रपटामुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री नाओमी स्कॉटने आता नेटफ्लिक्सच्या ‘अॅनाटॉमी ऑफ अ स्कॅन्डल’ या सहा भागांच्या मालिकेमध्ये प्रवेश मिळवला आहे. सारा वॉउघनच्या त्याच नावाच्या बेस्ट सेलिंग कादंबरीवर आधारित ही मालिका असेल.
या मालिकेची निर्मिती "बिग लिटल लायस"चा निर्माता डेव्हिड ई केली आणि "हाऊस ऑफ कार्ड्स" या शोची रनर मेलिसा जेम्स गिब्सन यांची आहे.
द हॉलिवूड रिपोर्टरच्या म्हणण्यानुसार, लंडनच्या पार्श्वभूमीवरील या वेब मालिकेत ब्रिटीश विशेषाधिकार असलेल्या एलिटमधील घोटाळ्याची कथा आहे आणि लैंगिक संमती आणि विशेषाधिकार या विषयाचा शोध घेण्यात आला आहे.
‘अॅनाटॉमी ऑफ अ स्कॅन्डल’मध्ये सिएन्ना मिलर, मिशेल डॉकरी आणि रूपर्ट फ्रेंड या कालाकारांचा समावेश आहे.
हेही वाचा -'मावडी कडेपठार', सुपरस्टार रजनीकांत यांच्या पूर्वजांचं मूळ गाव
"सक्सेशन" आणि "जेसिका जोन्स" या जगभर गाजलेल्या वेब मालिकांचा दिग्दर्शक एसजे क्लार्कसन या शोचे दिग्दर्शन करणार आहे.
हेही वाचा -माझ्याकडे सेलफोन किंवा कंप्यूटर नाही - ऑस्कर विजेता क्रिस्टोफर वॉकेन