ETV Bharat / sitara

संगीतकार अतुल ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये विनोदी अभिनेत्याच्या भूमिकेत! - Composer Ajay Atul

लवकरच इंडियन आयडॉल मराठी (Indian Idol Marathi)हा सांगीतिक रियालिटी शो सुरु होत आहे आणि त्याचे जज असणार आहेत प्रसिद्ध संगीतकार द्वयी, अजय अतुल (Composer Ajay Atul). नुकतीच त्यांनी पहिल्यांदाच हास्यजत्रेच्या मंचावर हजेरी लावली. अतुल गोगावले (Atul Gogavale) यांनी हास्यजत्रेच्या मंचावर एका स्कीटचं सादरीकरण केलं. अजयसाठी हे सरप्राईज होतं.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये अजय-अतुल

author img

By

Published : Nov 17, 2021, 3:23 PM IST

लवकरच इंडियन आयडॉल मराठी (Indian Idol Marathi)हा सांगीतिक रियालिटी शो सुरु होत आहे आणि त्याचे जज असणार आहेत प्रसिद्ध संगीतकार द्वयी, अजय अतुल (Composer Ajay Atul). नुकतीच त्यांनी पहिल्यांदाच हास्यजत्रेच्या मंचावर हजेरी लावली. या हास्यजत्रेच्या मंचावर अजयसाठी अतुलकडून सरप्राईज एक अनोखे सरप्राईज देण्यात आले. अजय-अतुल ही जोडी हास्यजत्रेत आली असताना एक दुग्धशर्करा योग जुळून आला आणि तो म्हणजे अतुल गोगावले (Atul Gogavale)यांनी हास्यजत्रेच्या मंचावर एका स्कीटचं सादरीकरण केलं. अजयसाठी हे सरप्राईज होतं. त्याला यातलं काहीच माहीत नव्हतं. आपल्या भावाला मंचावर पाहून अजयला आश्चर्यमिश्रित आनंद झाला.

अजय-अतुल या जोडीने अवघ्या महाराष्ट्राला आपल्या संगीतानी वेड लावलं. पण अजय-अतुल यांना भुरळ घातली ती 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमानी. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) घराघरांत अगदी आवडीनी पहिली जाते, त्याचप्रमाणे अजय-अतुल हेसुद्धा हा कार्यक्रम न चुकता पाहतात. 'इंडियन आयडल मराठी' या सोनी मराठी वाहिनीवर २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या कार्यक्रमात अजय-अतुल ही जोडी परीक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यानिमित्ताने अजय-अतुल यांनी हास्यजत्रेच्या मंचावर हजेरी लावली. 'इंडियन आयडल मराठी' या कार्यक्रमामध्ये परीक्षक होण्याचं आम्ही यासाठी ठरवलं की, त्यानिमित्ताने आम्हांला हास्यजत्रेच्या मंचावर जाता येईल, असंही ते या वेळी गमतीने म्हणाले.

‘आम्हाला हसवणाऱ्या आणि आमचं लॉकडाऊन सुसह्य करणाऱ्या हास्यजत्रेला आपल्या परीने काहीतरी द्यावं म्हणून एखाद्या स्कीटमध्ये सहभागी व्हावं, असं वाटलं. संगीतकार जेव्हा विनोदी भूमिका करतो, तेव्हा नक्की काय होतं, हे जाणून घेण्यासाठी या आठवड्यात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' नक्की पाहा’, असं अतुल म्हणाला.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा', हा विनोदी कार्यक्रम सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होतो.

हेही वाचा - Aniket VishwasRao : मराठी अभिनेता अनिकेत विश्वासरावसह तिघांवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.