मुंबई - संगीतकार प्रीतम चक्रवर्ती यांचे वडील प्रबोध चक्रवर्ती यांचे अल्जाइमर या आजारामुळे निधन झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून या आजारामुळे ते त्रस्त होते.
प्रीतम यांचे वडील गेल्या तीन महिन्यांपासून रुग्णालयात भरती होते. रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रीतम, त्यांची बहिण आणि आई रुग्णालयात होत्या. गेल्या दोन वर्षांपासून ते आजारी होते. तीन महिन्यांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पार्किन्सन आणि अल्जाइमर या आजारामुळे त्यांचा जीवनप्रवास थांबला.
प्रबोध चक्रवर्ती यांच्यावर अंबोली येथे अंतिमसंस्कार रविवारी करण्यात आले. प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी त्यांना सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली आहे.