मुंबई - ९०चे दशक संगीतमय तर होतेच परंतु विदेशांत लोकप्रिय असलेला ट्रेंड, ’म्युझिक व्हिडीओज’, सुद्धा आपल्याकडे प्रचलित झाला होता. आता पुन्हा एकदा हाच ट्रेंड संगीत क्षेत्रात परतलाय आणि दिग्गज कलाकार याचा भाग होताना दिसताहेत. अक्षय कुमार, विक्की कौशल, टायगर श्रॉफ आदींनंतर या पंक्तीत सामील होणारा एक सुंदर चेहरा म्हणजे मृणाल ठाकूर. तिने गुरु रंधावा सोबत आगामी म्युझिक व्हिडीओत काम करण्याची तयारी दर्शविली आहे.
सूत्रांनुसार असे समजते की, “संबंधित गाणे ‘मिक्सिंग’ च्या अंतिम टप्प्यात आहे. एका अप्रतिम लोकेशनवर या गाण्याचे चित्रीकरण करण्याचे ठरले असून शूट दोन दिवस चालेल. मृणालला त्याबाबत कल्पना देण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये ती अल्ट्रा-ग्लॅमरस लूकमध्ये दिसणार असून तिने असा लूक पहिल्यांदाच ल्यायला आहे. मृणालचा फॅशन-सेन्स उत्तम असून ती उत्तमोत्तम फॅशन डिझायनर्ससाठी रॅम्प-वॉक करत असते. या व्हिडिओत मृणाल ‘सेनश्युअस’ आणि ‘सीझलिंग’ लूक मध्ये दिसेल. तिचा असा सेक्सी अंदाज प्रेक्षकांना भावेल यात शंकाच नाही.”
‘अभी ना छोडो मुझे’ हे गाण्याचे शीर्षक असून गुरु रंधावाने ते गायले आहे. काश्मीरच्या सुंदर, स्वर्गीय वादींमध्ये या व्हिडिओचे शूटिंग करण्यात येणार आहे. पुढील महिन्यात संगीत दिग्गज टी-सिरीज हे गाणे प्रदर्शित करेल.
हेही वाचा -ड्रग प्रकरणात विवेक ओबेरॉयचा मेहुणा आदित्य अल्वाला अटक