सध्या संगीत क्षेत्रात गाण्यांच्या रेकॉर्डिंग्जसोबतच त्याचा म्युझिक व्हिडीओदेखील बनविण्याचा ट्रेंड आहे. बरीच व्हिडीओ सिंगल्स लोकप्रिय झालेली दिसताहेत. एक नवीन म्युझिक व्हिडीओ तयार झालाय ज्याचे नाव आहे ‘मन उनाड उनाड‘ ज्यात अभिनेत्री मोनालिसा बागल, अभिनेता अभिजित अमकर ही जोडी दिसणार आहे. अतिशय नितळ काव्य, उत्तम संगीत आणि नेत्रसुखद छायांकनाचा आनंद या म्युझिक व्हिडिओतून प्रेक्षकांना घेता येईल.
‘झाला बोभाटा’, ‘भिरकीट’, ‘बेभान’ अशा अनेक चित्रपटांमधून मोनालिसा बागल चमकली आहे, तर एक सांगायचंय’, टकाटक’ अशा चित्रपटांतून अभिजित अमकरनं आपली छाप उमटवली आहे.
![music album 'Man Unad Unad'](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-man-unad-unad-monalisa-bagal-abhijit-amkar-mhc10001_15042021001216_1504f_1618425736_254.jpeg)
किरण कलकुंबे आणि विशाल शिंदे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं मधुर शिंदे आदिती नेरूरकर यांनी गायलं आहे. तर सविता करंजकर जामले यांनी गीतलेखन केलं आहे. कृतिक माझिरे यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे, तर अनिकेत यांनी छायांकनाची जबाबदारी निभावली आहे.
सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष यांनी या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली असून बीना राजाध्यक्ष या सहनिर्मात्या आहेत. सप्तसूर म्युझिक आणि फिल्मी आऊल स्टुडिओज या म्युझिक व्हिडिओचे प्रस्तुतकर्ते आहेत. सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर हा म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित होईल.
हेही वाचा - टकाटक’ च्या सिक्वेलच्या शूटिंगला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर झाली सुरूवात!