ETV Bharat / sitara

'मोलकरीण बाई' मालिकेच्या पहिल्या भागाचे जमके सेलिब्रेशन! - मोलकरीण बाई- मोठी तिची सावली

'मोलकरीण बाई...' या मालिकेत उषा नाडकर्णी, सारिका निलाटकर, सुप्रिया पाठारे आणि अश्विनी कासार या चार अभिनेत्री मोलकरणीच्या रुपात दिसणार आहेत.

'मोलकरीण बाई' मालिकेच्या पहिल्या भागाचे जमके सेलिब्रेशन
author img

By

Published : Mar 26, 2019, 5:20 PM IST

मुंबई - 'स्टार प्रवाह' वाहिनीवर २५ मार्चपासून 'मोलकरीण बाई- मोठी तिची सावली' ही नवीन मालिका सूरू झाली आहे. मराठी मालिकांमध्येही आता नवनविण प्रयोग व्हायला लागले आहेत. ही मालिकादेखील वेगळ्या विषयावर आधारित आहे. त्यामुळेच या मालिकेच्या पहिल्या भागाचे मालिकेच्या टीमसाठी खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते.

'मोलकरीण बाई...' या मालिकेत उषा नाडकर्णी, सारिका निलाटकर, सुप्रिया पाठारे आणि अश्विनी कासार या चार अभिनेत्री मोलकरणीच्या रुपात दिसणार आहेत. त्या काम करत असलेल्या कुटुंबातील महिलांशी त्याचे असलेले संबंध, त्यांच्याशी जुळेलले नाते, आणि त्यांच्याशी वाटणारा मानसिक आधार, यावर या मालिकेतून प्रकाश टाकण्यात आला आहे. याशिवाय भार्गवी चिरमुले, विक्रम गायकवाड, गायत्री सोहम यांच्याही या मालिकेत महत्त्वाच्या व्यक्तिरेखा आहेत.
'कुलवधू', 'पुढचं पाऊल' यांसारख्या मालिकांचे दिग्दर्शन करणारे वैभव चिंचाळकर हे या मालिकेचे दिग्दर्शन करत आहेत.

भरजरी कपडे, मोठया गाड्या, बड्या घरात घडणारी कथानक, प्रेम, विवाहबाह्य संबंध, पती पत्नीचा दुरावा यावर अनेक मालिका आत्तापर्यंत येऊन गेल्या आहेत. मात्र, आता घराघरात राबणाऱ्या हातांची गोष्ट छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या मालिकेला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, याची उत्सुकता आहे.

'मोलकरीण बाई' मालिकेच्या पहिल्या भागाचे जमके सेलिब्रेशन

पहिल्या भागाचे स्क्रिनिंग पार पडल्यानंतर मालिकेच्या टीमने जमके पार्टी केली. यात सगळ्यांनी मिळून मस्त डान्स केला. यामुळे एरवी पडद्यावर साधे कपडे घालून घरकाम करणाऱ्या मोलकरीण बाई पार्टीत मात्र मस्त कपडे घालून मनसोक्त डान्स करताना दिसल्या. २५ मार्चपासून सुरू झालेली ही मालिका सोमवार ते शुक्रवार दररोज संध्याकाळी ६.३० वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Intro:'स्टार प्रवाह' वाहिनीवर कालपासून 'मोलकरीण बाई' मोठी तिची सावली ही नवीन मालिका सूरु झाली. आजवरच्या मराठी मालिकापेक्षा फारच वेगळ्या विषयावर ही मालिका आधारित आहे. त्यामुळेच या मालिकेच्या पहिल्या भागाच टीमसाठी खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात आलं होत.

या मालिकेत उषा नाडकर्णी, सारिका निलाटकर, सुप्रिया पाठारे आणि अश्विनी कासार या चार मोलकरिणीच्या रुपात दिसणारेत. त्या काम करत असलेल्या कुटुंबातील महिलांशी त्याचे असलेले संबंध, त्यांच्याशी जुळेलल नात, आणि त्यांच्याशी वाटणारा मानसिक आधार यावर या मालिकेतून प्रकाश टाकण्यात आला आहे. याशिवाय भार्गवी चिरमुले, विक्रम गायकवाड, गायत्री सोहम यांच्याही या मालिकेत महत्त्वाच्या व्यक्तिरेखा आहेत. कुलवधू, पुढचं पाऊल यासारख्या मालिकाच दिग्दर्शन करणारे वैभव चिंचाळकर हे या मालिकेचं दिग्दर्शन करतायत.

भरजरी कपडे, मोठया गाड्या, बड्या घरात घडणारी कथानक, प्रेम, विवाहबाह्य संबंध, पती पत्नीचा दुरावा यावर अनेक मालिका येऊन गेल्या आहेत. मात्र आता घराघरात राबणाऱ्या हातांची गोष्ट छोट्या पडद्यावर येऊ घातली आहे त्यामुळे या मालिकेला कसा प्रतिसाद मिळतो याची उत्सुकता आहे.

आज पहिल्या भागाच स्क्रिनिंग पार पडल्यानंतर मालिकेच्या टीमने जमके पार्टी केली.यात सगळ्यांनी मिळून मस्त डान्स केला. यामुळे एरवी पडद्यावर साधे कपडे घालून घरकाम करणाऱ्या मोलकरीण बाई पार्टीत मात्र मस्त कपडे घालून मनसोक्त डान्स करताना दिसल्या. कालपासून सुरू झालेली ही मालिका सोमवार ते शुक्रवार दररोज संध्याकाळी साडे सहा वाजता आपल्याला पाहायला मिळेल.

Body:.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.