बनावट कॉल सेंटरच्या मदतीने अमेरीकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या मॉडेल आरती सक्सेनाला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरतीने अनेक मालीका आणि रियालीटी शोमध्ये काम केलं आहे. या प्रकरणी आरतीचा बॉयफ्रेंड डेव्हीड जॉर्ज अल्फान्सो याला आधीच अटक करण्यात आली आहे.
पेशाने मॉडेल असलेल्या या आरतीला बोगस कॉल सेंटर उघडून अमेरीकन नागरीकांना फसवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरतीचा बॉयफ्रेंड डेव्हीड जॉर्ज अल्फांन्सोच्या सोबतीने आरतीने बनावट कॉल सेंटर सुरू केले होते.
आरती आणि तीच्या बॉयफ्रेंडने एक्सफिनीटी नावाचं बनावट कॉलसेंटर सूरू केलं. कॉलसेंटरमधून अमेरीकन नागरिकांचा डेटा वापरून ही टोळी त्यांना फोन करत असे. फोन वर कधी धमकावून तर कधी घाबरवून तर कधी त्यांच्याशी गोड बोलून त्यांच्या संगणकात व्हायरस असल्याचं त्यांना सांगत होते. तुमच्या संगणकात लवकरात लवकर अँटी व्हायरस वापरा अन्यथा तुमची खाजगी माहिती सार्वजनीक होईल अशी भीती दाखवून अँटी व्हायरस विक्रीच्या नावाखाली त्यांच्याकडून पैसे उकळले जात असत. प्रत्यक्षात मात्र कुठलेही अँटी व्हायरस मात्र दिले जात नव्हते.
प्रकरणी मॉडेल आरती हिने न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली होती. कोर्टात आत्मसमर्पण करून जामीन मिळवण्याच्या तयारीत असताना गुन्हे शाखेने तिचा डाव हाणून पाडला. कॉल सेंटरच्या मदतीने अमेरीकन नागरिकांची फसवणूक करत असताना बॉयफ्रेंड डेव्हीड जॉर्ज अल्फान्सोने याने त्याची प्रेयसी आरतीला जॅग्वॅर गाडी भेट दिली होती ,या गाडीचा गुन्हे शाखा शोध घेतेय.