ETV Bharat / sitara

मिलींद सोमणच्या पत्नीचे वंशवादावर भाष्य : ''मेडल मिळवले तरच 'फक्त' ईशान्य लोक भारतीय असू शकतात'' - ईशान्य लोकांच्या छळाच्या घटना वाढल्या

मिलिंद सोमण यांची पत्नी अंकिता कोंवर यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये ईशान्येकडील लोकांवरील जातीय भेदभावाबद्दल लिहिले आहे. कोंवर यांच्या पोस्टवर नेटिझन्सकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टर मीराबाई चानूचे रौप्य पदक मिळवल्यानंतर काही 'ढोंगी' लोकांकडून आनंद साजरा केला जातोय, हे लोक जातीय भेदभाव बाळगणारे असल्याचे अंकिता यांनी म्हटलंय.

Milind Soman's wife on racism
मिलींद सोमणच्या पत्नीचे वंशवादावर भाष्य
author img

By

Published : Jul 27, 2021, 10:06 PM IST

मुंबई - अभिनेत्री-मॉडेल मिलिंद सोमण यांची पत्नी अंकिता कोंवर यांनी ईशान्येकडील लोकांवरील जातीय भेदभावाबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टर मीराबाई चानूचे रौप्य पदक मिळवल्यानंतर काही 'ढोंगी' लोकांकडून आनंद साजरा केला जातोय, हे लोक जातीय भेदभाव बाळगणारे असल्याचे अंकिता यांनी म्हटलंय.

अंकिता या गुवाहटीच्या रहिवासी आहेत. त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलंय, "जर तुम्ही ईशान्य भारतीय असाल आणि तुम्ही जेव्हा देशासाठी पदक जिंकता तेव्हाच तुम्ही भारतीय असता. नाहीतर तुमची ओळख 'चिंकी', 'चायनीस', 'नेपाळी' किंवा नवीन भर 'कोरोना' अशी असते. भारतात केवळ जातीयवादच नाही तर वंशवादही आहे. अनुभवातुन बोलत आहे, # हायपोक्रिट्स."

  • If you’re from Northeast India, you can become an Indian ONLY when you win a medal for the country.
    Otherwise we are known as “chinky” “Chinese” “Nepali” or a new addition “corona”.
    India is not just infested with casteism but racism too.
    Speaking from my experience. #Hypocrites

    — Ankita Konwar (@5Earthy) July 27, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कोंवर यांच्या पोस्टवर नेटिझन्सकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी त्यांच्या अनुभवाशी सहमती दाखवली आहे तर काहींना हे थोडे जास्त वाटत आहे.

''एक दोन घटनावरुन संपूर्ण चित्र तसेच आहे असे ठरवू नका,'' असे एका युजरने म्हटले. त्याला उत्तर देताना अंकिता म्हणाल्या,'' हाहाहाहा, तुमच्या भ्रमाच्या जगातच राहा. जोपर्यंत त्रास होत नाही तोपर्यंत कोणीही काळजी करीत नाही."

अंकिता यांनी ही प्रतिक्रिया अशा वेळी आली आहे जेव्हा देश ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानू यांचे अभिनंदन करीत आहे. तर दुसरीकडे ईशान्य भारताच्या नागरिकांवरील छळाच्या घटनाही वाढल्या आहेत.

मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवर यांनी कोणाचीही पर्वा न करता 2018 मध्ये विवाह केला होता. दोघांमधील वयामध्ये 26 वर्षांचे अंतर आहे.

हेही वाचा - राज कुंद्राच्या कंपनीचा बिग बॉस स्पर्धकांवर होता डोळा : मॉडेल सागरिकाचा खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.