मुंबई - व्हॅलेंटाईन डे सर्वत्र साजरा होत असताना टीव्ही मालिकांमध्येही हा दिवस अनोख्या पध्दतीने साजरा होतोय. फुलपाखरु मालिकेतील हृता दुर्गुळे म्हणजेच वैदेही आणि यशोमन आपटे म्हणजेच मानस हे मराठी टीव्ही मालिकामधले मोस्ट डिझायरेबल अभिनेता आणि अभिनेत्री ठरलेत. याच यशाचं ग्रँड सेलिब्रेशन नुकतंच फुलपाखरू मालिकेच्या सेटवर केक कापून करण्यात आलं.
दोघांच्या संसारात माहीच आगमन झाल्याने ते हा खास दिवस कसा साजरा करणारेत आणि जर तुम्हाला त्यांना इम्प्रेस करायचं असेल तर काय करायला हवं ते आम्ही त्यांच्याकडून जाणून घेतलंय.