ETV Bharat / sitara

नेटफ्लिक्सच्या 'बॅड बॉय बिलेनियर:इंडिया'विरोधात मेहुल चोक्सी उच्च न्यायालयात

author img

By

Published : Aug 26, 2020, 5:18 PM IST

'बॅड बॉय बिलेनियर:इंडिया' ही नेटफ्लिक्सची आगामी सिरीज आहे. यात भारतातील आतापर्यंतचे मोठे आर्थिक घोटाळे आणि त्यात सहभागी असलेल्या उद्योगपतींच्या गोष्टी सांगितल्या जाणार आहेत. त्यात मेहुल चोक्सीचाही समावेश आहे. चोक्सीने या वेबसिरीजच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Mehul Choksi
मेहुल चोक्सी

नवी दिल्ली - फरारी घोषीत हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याने नेटफ्लिक्सच्या 'बॅड बॉय बिलेनियर:इंडिया' या वेबसिरीजच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या वेबसिरीजच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकल्याची मागणी त्याने केली आहे.

'बॅड बॉय बिलेनियर:इंडिया' ही नेटफ्लिक्सची आगामी सिरीज आहे. यात भारतातील आतापर्यंतचे मोठे आर्थिक घोटाळे आणि त्यात सहभागी असलेल्या उद्योगपतींच्या गोष्टी सांगितल्या जाणार आहेत. त्यात मेहुल चोक्सीचाही समावेश आहे. आपल्या विरोधात दाखल केलेल्या खटल्याचा तपास आणि निर्णय अद्याप पूर्ण झालेला नाही. असे असतानाही नेटफ्लिक्सने वेबसिरीजमध्ये आपला समावेश केला आहे. चोक्सीने यावर आक्षेप घेतला आहे.

मेहुल चोक्सीच्यावतीने वकील विजय अग्रवाल यांनी दिल्ली उच्च न्यायलयात याचिका दाखल केली आहे. न्यायाधीश नवीन चावला यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. या प्रकरणाची पुढील सुनावणी २८ ऑगस्टला होणार आहे. नेटफ्लिक्सच्यावतीने ज्येष्ठ वकील नीरज किशन यांनी युक्तीवाद केला.

मेहुल चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांनी वेबसिरीज प्रदर्शित होण्याअगोदर नेटफ्लिक्सने न्यायालयासमोर स्पेशल स्क्रिनिंग ठेवावे, अशी मागणीही केली आहे. नेटफ्लिक्सची 'बॅड बॉय बिलेनियर:इंडिया' ही वेबसिरीज येत्या २ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेची सुमारे १३ हजार ४०० कोटींची फसवणूक केली आहे. या प्रकरणानंतर दोघांनीही देशाबाहेर पलायन केले आहे. त्यांना न्यायालयाने फरारी घोषित केले आहे. ईडी आणि सीबीआय दोघांनाही चोक्सी व मोदी ताब्यात हवे आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.