ETV Bharat / sitara

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंगच्या मेहंदीचे फोटो व्हायरल - Neha Kakkar's haladi Ritual

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांच्या हळदीचा विधी पार पडला असून तिने मेहंदीचे काढलेले फोटो चाहत्यांना आवडले आहेत. अनेक प्रतिक्रिया तिच्या फोटोवर मिळत आहेत.

Neha Kakkar and Rohanpreet Singh
नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग
author img

By

Published : Oct 23, 2020, 6:33 PM IST

नवी दिल्ली - नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांच्या लग्नापूर्वीचा विधीसोहळा सुरू झाला आहे. आज त्यांच्या हळदीचे आणि मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. हळदीसाठी नेहा पिवळ्या प्लेन साडीमध्ये दिसली आहे, तर रोहनप्रीत पिवळ्या कुर्त्यामध्ये दिसला आहे.

दुसर्‍या फोटोत नेहा हातावर व पायांवर मेहंदी लावताना दिसत आहे. नेहावर मेहंदी लावण्याची जबाबदारी दिल्लीच्या प्रसिद्ध राजू मेंहदी वाला यांना देण्यात आली आहे.

हे फोटो पाहून एकाने तिला प्रतिक्रिया दिलीय की, पिवळा रंग तुला खूप शोभून दिसतोय. नेहाला लाल रंगाच्या लेंहग्यात पाहण्यासाठी आतुर असल्याचे एकाने म्हटलंय.

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांची भेट 'नेहू दा ब्याह' या म्यूझिक व्हिडीओच्या सेटवर झाली होती. नंतर त्यांच्यातील प्रेम फुलत गेले आणि आता ते लग्नगाठीमध्ये बांधले जाणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.