ETV Bharat / sitara

‘माझी तुझी रेशीमगाठ'मधील नेहा आणि परी म्हणताहेत, "अपने पास बोहोत पैसे है"! - ‘माझी तुझी रेशीमगाठ' झी मराठीवर

झी मराठीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. मालिकेतील श्रेयस आणि प्रार्थनाची जोडी आणि छोटी परी हिची चर्चा घराघरात होतेय. मालिकेत नेहा आणि परी या दोघींचा 'अपने पास बोहोत पैसे है' हा डायलॉग अतिशय गाजला आहे.

author img

By

Published : Sep 28, 2021, 10:50 PM IST

श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे यांनी ‘माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून प्रेक्षकांचे प्रेम जिंकले आहे. त्यातच छोटी मायरा तर संपूर्ण महाराष्ट्राची अत्यंत लाडकी झाली आहे. या मालिकेतील आई नेहा आणि परी यांची जोडी म्हणजे सॉल्लिड टीम बनली आहे. पडद्यावर तर त्यांचे बॉण्डिंग दिसून येतेच परंतु पडद्यामागेदेखील त्या दोघी धमाल करीत असतात. नुकतेच त्यांचे ‘अपने पास बोहोत पैसे है’ लिहिलेले टी-शर्ट मधील फोटो खूप ट्रेंडिंग आहेत.

झी मराठीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. मालिकेतील श्रेयस आणि प्रार्थनाची जोडी आणि छोटी परी हिची चर्चा घराघरात होतेय. मालिकेत अनेक दिग्गज कलाकारांची फौज आहे. श्रेयस आणि प्रार्थनाची जोडी तर सगळ्यांना भावतेच आहे पण या मालिकेत अजून एक जोडी आहे जी प्रेक्षकांची अतिशय आवडती आहे आणि ती जोडी म्हणजे परी आणि नेहाची. आई आणि मुलीची ही गोड जोडी सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटवतेय.

नुकतेच पोस्ट केलेले नेहा आणि परीचे, म्हणजेच प्रार्थना आणि मायराचे, काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मालिकेत नेहा आणि परी या दोघींचा 'अपने पास बोहोत पैसे है' हा डायलॉग अतिशय गाजला आणि हाच डायलॉग लिहिलेलं टीशर्ट दोघींनी फोटोमध्ये घातलेलं दिसतंय. हे फोटोज खूपच कमाल असून त्यावर नेटिझन्स प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील आई आणि परीची ही सॉल्लिड टीम सगळ्यांची फेव्हरेट झाली आहे.

हेही वाचा - 'सर्वकाही गमावण्याच्या' भीतीने परिवर्तनाच्या प्रवासाला चालना मिळाली लिझेल रेमो डिसुझा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.