ETV Bharat / sitara

मराठी मालिका ‘जीव झाला येडापिसा’ आता हिंदीत ‘बावरा दिल’ म्हणून होणार प्रसारित! - ‘बावरा दिल’ २२ फेब्रुवारीला प्रसारित होणार

मराठी लोकप्रिय शो ‘जीव झाला येडापिसा’ चे रुपांतर असलेला शो कलर्सवर ‘बावरा दिल’ बनून येत आहे. ही सिध्दी (किंजल धामेचा) आणि शिव (आदित्य रेडीज) यांची द्वेषपूर्ण प्रेमकथा आहे. बावरा दिल’ हा शो २२ फेब्रुवारीला प्रसारित होणार आहे.

‘बावरा दिल’
'Bavra Dil'
author img

By

Published : Feb 13, 2021, 7:15 PM IST

सिध्दी आणि शिवाचे प्रेम, तिरस्कार आणि सूडाची प्रेमकथा मराठीत ‘जीव झाला येडापिसा’ मालिकेतून प्रेक्षकांना भावली होती व आता हीच मालिका हिंदीमध्ये ‘बावरा दिल’ या नावाने बनतेय. कलर्स मराठी ची मालिका आता कलर्स वर सादर होणार आहे. ‘बावरा दिल’ ही द्वेष आणि विनाशाने डागाळलेली एक वैशिष्ट्यपूर्ण प्रेमकथा आहे. असे नेहमी म्हटले जाते की प्रेमा नंतर दुसरी तीव्र भावना म्हणजे तिरस्कार, ज्यातून सूडाची तहान उत्पन्न होते आणि उत्कटता वाढते. पण द्वेष असलेल्या ठिकाणी प्रेम विसावू शकत नाही आणि एकमेकांचे आयुष्य उद्ध्वस्त कऱण्याची शपथ घेतलेल्या दोन व्यक्ती प्रेमात पडू शकत नाही.

हे कितीही खरे असले तरी कलर्स मराठीवर चालू असलेला मराठी लोकप्रिय शो ‘जीव झाला येडापिसा’ चे रुपांतर असलेला शो कलर्सवर ‘बावरा दिल’ बनून येत आहे. ही सिध्दी (किंजल धामेचा) आणि शिव (आदित्य रेडीज) यांची द्वेषपूर्ण प्रेमकथा आहे. शिव हा एक तगडा, अँग्री यंग मॅन असून तो शक्तिशाली राजकारणी आक्काबाईचा (सुमुखी पेंडसेने) अभिमान आणि आनंद आहे, तर सिध्दी एक सुशिक्षीत आणि हुशार मुलगी असून तिच्यात नैतिकतेची भावना जबरदस्त आहे. जेव्हा शिव आणि सिध्दी एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांची सुरूवात एका गैरसमजाने होते आणि त्यांच्यात तिरस्काराचे नाते तयार होते.

महाराष्ट्रातील रुद्रायत या गावातील पाया प्रथमच बदलला गेला, जेव्हा आक्काबाईने गावाची शक्तिशाली सूत्रे हाती घेतली, तेव्हा ते सर्व झाले २६ वर्षांच्या एका शीघ्रकोपी बंडखोर तरूण मुलामुळे, शिवा लष्करे मुळे. तो अगदी नारळासारखा आहे, बाहेरून कठोर, आतून मऊसूत. जरी प्रौढी मिरविणारा दिसत असला, तरी त्याचे हृदय सोन्यासारखे आहे. जेव्हा रुद्रायत मधील सिध्दी नावाची एक तरुण मुलगी जेव्हा त्याला चुकीच्या मार्गाने चिडवते तेव्हा त्याच्या रागाला सीमा रहात नाही. तर दुसरीकडे सिध्दी गोकर्ण एक तरूण, हुशार मुलगी असून तत्ववादी आहे व ती जे योग्य आहे त्याच्या बाजूने उभी राहते. रुद्रायत मधील आदरणीय शिक्षकाची मुलगी असलेल्या सिध्दीला न्यायाची चाड आहे. पण न्यायाच्या बाजूने उभी राहण्याची किंमत तिला तिचे जीवन पूर्णपणे बदलण्यात द्यावी लागते. एकत्र आल्यावर शिव आणि सिध्दी आग व बर्फाप्रमाणे आहेत. तरीही ते एकत्र येतात, पण फक्त एकमेकांचा नाश करण्यासाठीच. जेव्हा शिव आणि सिध्दी लग्नाच्या पवित्र बंधनात अडकतात तेव्हा काय होईल?

शोमध्ये पदार्पण करणारी, सिध्दी गोकर्णची भूमिका साकारणारी, किंजल धामेचा म्हणाली, “माझ्यासाठी, कलर्स वर एका मुख्य भूमिकेतून पदार्पण करणे आणि तेही अशा प्रकारच्या चमकदार कथेतून म्हणजे माझे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. बावरा दिल मालिका पूर्णपणे प्रेम व सूड यावर आधारित असून संकल्पना दिमाखदार आहे आणि पात्ररचना खूप असाधारण आहे. सिध्दीचे पात्र माझ्यासाठी खूप विशेष आहे. मला नेहमीच अशा प्रकारची सशक्त भूमिका साकारायची होती. ती विचारी, स्वयंभू आहे आणि जीवनाने तिच्याकडे जे दिले त्यावर मात करण्याची ताकद तिच्यात आहे. तिच्यातील या गुणधर्मामुळे मी तिच्याशी जोडले गेले आहे आणि मला खात्री आहे की प्रेक्षक सुध्दा हे पात्र आणि तिचा प्रवास यावर प्रेम करतील.”

शिव लष्करेची भूमिका साकारणारा आदित्य रेडीज म्हणाला, “एक अभिनेता म्हणून प्रयोग करण्यावर माझा विश्वास आहे आणि मला शिवचे पात्र खूप आव्हानात्मक वाटले. बाहेरून कठोर पण मनातून लहान मूल असलेला शिव गुंतागुंतीचा पण रोमांचक आहे. कलर्स सोबत पुन्हा एकदा काम करताना मला आनंद होत आहे. मी कृतज्ञ आहे कारण माझा अभिनय प्रवास येथूनच सुरु केला होता. मी खूप उत्सुक आहे आणि मला आशा आहे की हा शो मधून आम्ही उल्लेखनीय उंची गाठू.”

हॅपी हाय क्रिएशन्स द्वारा निर्मित, ‘बावरा दिल’ २२ फेब्रुवारीला प्रसारित होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.