ETV Bharat / sitara

'उत्तर शोधलं की जगणं बदलतं', मराठी 'कौन बनेगा करोडपती'चं धमाल टायटल ट्रॅक - marathi

आयुष्याला कलाटणी देणाऱ्या, तुमची स्वप्न पूर्ण करायला मदतीचा हात देणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची हिच खरी वेळ असल्याचं नागराज मंजुळे यांनी या गाण्यातून सांगितले आहे.

'उत्तर शोधलं की जगणं बदलतं', मराठी 'कौन बनेगा करोडपती'चं धमाल टायटल ट्रॅक
author img

By

Published : Apr 28, 2019, 4:49 PM IST

मुंबई - आयुष्यात प्रत्येक वळणावर आपल्याला काही ना काही प्रश्न पडत असतात. त्या प्रश्नांचे उत्तरं शोधत शोधत आपण जगत असतो. या प्रश्नांपासून आपल्याला पळताही येत नाही आणि टाळताही येत नाहीत. त्यामुळे आपलं आयुष्य बदलत राहतं. अशाच आशयाचे बोल घेऊन मराठी 'कौन बनेगा करोडपती'चं शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

'कौन बनेगा करोडपती' या शोची सामान्य जनमानसात प्रचंड क्रेझ आहे. हिंदी वाहिनीवरील या शो'ने अनेक सर्वसामान्य व्यक्तींना करोडपती बनवले आहे. हिच संकल्पना मराठीतही उतरवली गेली. मराठीतही 'कौन बनेगा करोडपती' शोचे प्रसारण व्हायला लागले आणि पाहता पाहता मराठी मनातही या शोने आपले घर बनवले.

यावेळी या शोचे विशेष आकर्षण म्हणजे नागराज मंजुळे. मराठी चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर आता ते या शोच्या माध्यमातुन प्रश्न विचारताना दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या शोचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता या शोचे धमाल असे टायटल ट्रॅक प्रदर्शित करण्यात आले आहे.

आयुष्याला कलाटणी देणाऱ्या, तुमची स्वप्न पूर्ण करायला मदतीचा हात देणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची हिच खरी वेळ असल्याचं नागराज मंजुळे यांनी या गाण्यातून सांगितले आहे. या टायटल ट्रॅकचं दिग्दर्शन विजय मौर्या यांनी केलं आहे. तर संगीत ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी दिलं आहे. त्यांनीच या गाण्याला आवाजही दिला आहे. नागराज मंजुळेच्याही आवाजाची झलक या गाण्यातून ऐकायला मिळते.

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.