ETV Bharat / sitara

रिक्शा ड्रायव्हरची मुलगी असलेल्या मन्या सिंगचे रिक्शा रॅलीने स्वागत - ट्रेनच्या वॉशरुममध्ये स्वच्छ व्हायची मन्या सिंग

व्हीएलसीसी फेमिना मिस इंडिया २०२० स्पर्धेमध्ये रिक्षा चालकाची मुलगी मन्या सिंग फर्स्ट रनर अप व मिस यूपी बनली आहे. मंगळवारी १६फेब्रुवारी रोजी ऑटो रॅली काढली होती. ज्यामध्ये मन्या तिच्या आईसमवेत उपस्थित होती . यावेळी तिने मिस इंडिया रनर अपचा मुकुट परिधान केला होता.

Welcome to Manya Singh's Rickshaw Rally
मन्या सिंगचे रिक्शा रॅलीने स्वागत
author img

By

Published : Feb 16, 2021, 7:51 PM IST

Updated : Feb 19, 2021, 12:25 PM IST

मुंबई - व्हीएलसीसी फेमिना मिस इंडिया २०२० स्पर्धा १० फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. मानसा वाराणसी या वर्षाची विजेती ठरली आहे. तिने मिस इंडियाचे विजेतेपद जिंकले आहे. त्याचबरोबर ऑटो रिक्षाचालकाची मुलगी मन्या सिंग फर्स्ट रनर अप व मिस यूपी बनली आहे. तर मनिका श्योकंद सेकंड रनर अप ठरली आहे.

मन्या सिंगचे रिक्शा रॅलीने स्वागत

वडिलांच्या रिक्शातून मन्या सिंगची मिरवणूक

खरं तर, मन्या सिंगचे वडील ओमप्रकाश सिंह यांनी मंगळवारी १६ फेब्रुवारी रोजी ऑटो रॅली काढली होती. ज्यामध्ये मन्या तिच्या आईसमवेत उपस्थित होती. यावेळी तिने मिस इंडिया रनर अपचा मुकुट परिधान केला होता. त्या दरम्यान मन्याने आईच्या पायाला स्पर्शही केला. वडिलांच्या ऑटो व्यतिरिक्त अनेक लोकांनी ऑटो रॅलीत सहभाग घेतला. रॅली श्याम नारायण ठाकूर मार्ग येथून ठाकूर गाव आणि कांदिवली पूर्व मुंबई येथे काढण्यात आली.

मन्या सिंगचा खडतर जीवन प्रवास

सर्व आर्थिक अडचणींचा सामना करूनच मन्या सिंगने हे स्थान मिळवले आहे. मन्या सिंगने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले होते की तिचे वडील रिक्षाचालक आहेत. तिच्या आयुष्यात तिला एक मोठा संघर्ष पाहायला मिळाला आहे. त्यांना बर्‍याच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. उपाशी राहून अनेक रात्री काढाव्या लागल्या. हिंमत न हारता तिने आपले ध्येय साध्य केले आहे.

दारिद्र्यात जगावे लागले जीवन

मान्या लहान वयातच कामाला लागली. तिच्याकडे पुस्तके खरेदी करण्याचीही क्षमता नव्हती. मन्याने हे देखील सांगितले होते की, 'तिच्या आईवडिलांनी असलेले दागिने विकले आणि तिला शिकवले. उत्तर प्रदेशमध्ये एक स्त्री म्हणून राहणे इतके सोपे नाही आणि तिच्या आईने शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप त्रास सहन केला आहे. उत्तर प्रदेश हे पुरुषप्रधान राज्य आहे आणि महिलांवरील अत्याचारासाठी कुख्यात आहे.

कॉल सेंटरमध्ये नोकरी करीत होती मन्या

मन्या म्हणाली की, ''तिने वयाच्या १४ व्या वर्षी सर्व काही सोडले होते आणि ती घराबाहेर पळून गेली होती. ती दिवसा काही तरी अभ्यास करायची, संध्याकाळी डिशेस करायची आणि रात्री कॉल सेंटरमध्ये काम करायची.''

ट्रेनच्या वॉशरुममध्ये स्वच्छ व्हायची मन्या सिंग

मान्या पुढे म्हणतो की, 'तिने ट्रेनच्या वॉशरूममध्ये स्वत: ला स्वच्छ केले आणि रिक्षाचा पैसा वाचवण्यासाठी ती तासन्तास चालत असे. खूप काही केले आणि आज ती इथवंर पोहोचली आहे.

हेही वाचा - दीया मिर्झा-वैभव रेखीच्या लग्नानंतरची पहिली झलक

Last Updated : Feb 19, 2021, 12:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.