ETV Bharat / sitara

लोक पाण्याची भीक मागत आहेत अन् सरकार सेल्फीत मग्न, मानसी नाईकचा महाजनांना टोला

मानसी नाईकने दीपालीची भेट घेतली, यावेळी मानसीला अश्रू अनावर झाले. पाणी हा हक्क आहे, मग असं असताना पाण्यासाठी भीक मागण्याची वेळ का येते? असा प्रश्न यावेळी मानसीने उपस्थित केला.

मानसीनं घेतली दीपाली सय्यदची भेट
author img

By

Published : Aug 10, 2019, 8:22 PM IST

अहमदनगर - जिल्ह्यातील साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी अभिनेत्री दीपाली सय्यदने ९ तारखेपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. आज या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. दीपाली सय्यदच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी सिने अभिनेत्री मानसी नाईकसह अनेक कलाकारांनी उपोषण स्थळी हजेरी लावली.

मानसी नाईकने दीपालीची भेट घेतली, यावेळी मानसीला अश्रू अनावर झाले. पाणी हा हक्क आहे, मग असं असताना पाण्यासाठी भीक मागण्याची वेळ का येते? असा प्रश्न यावेळी मानसीने उपस्थित केला. राज्यात सध्या काही ठिकाणी पूर परिस्थिती आहे तर नेते, मोठे लोक मदत करण्याऐवजी याठिकाणी सेल्फी घेण्यात आणि व्हिडिओ काढण्यात दंग असल्याचं म्हणत तिनं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली.

मानसी नाईकचा महाजनांना टोला

पाण्यावर सर्वांचा हक्क आहे, मग सरकार कुणाला पाण्यासाठी वंचित कसे ठेवू शकते, असा प्रश्न मानसी नाईकने उपस्थित केला. दीपालीच्या आंदोलनाला आपला पाठिंबा असून एका बहिणीचा हा संघर्ष पाहून डोळ्यात पाणी आल्याची भावना यावेळी तिनं व्यक्त केली.

Intro:अहमदनगर- सरकार सेल्फीत मग्न.. मानसी नाईकचा दीपाली सय्यद आंदोलनाच्या निमित्ताने महाजनांना टोला..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_hunger_strick_visit_vij_7204297

अहमदनगर- सरकार सेल्फीत मग्न.. मानसी नाईकचा दीपाली सय्यद आंदोलनाच्या निमित्ताने महाजनांना टोला..

अहमदनगर- नगर जिल्ह्यातील साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी अभिनेत्री दीपाली सय्यदच 9 तारखेपासून पासून आमरण उपोषण सुरू आहे. आज या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. दीपाली सय्यदच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी सिनेअभिनेत्री मानसी नाईक सह अनेक कलाकारांनी हजेरी लावलीय. मानसी नाईकने उपोषण स्थळी दीपाली भेट घेतली यावेळी मानसीला अश्रू अनावर झाले होते. पाणी हा हक्क आहे मग अस असतांना भीक मागण्याची का वेळ येते अस प्रश्न यावेळी मानसीने व्यक्त केला. राज्यात सध्या काही ठिकाणी पूर परिस्थिती आहे तर नेते, मोठे लोक मदत करण्याचा ठिकाणी सेल्फी, व्हिडिओ करण्यात दंग असल्याची टीका जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केली. पाण्यावर सर्वांचा हक्क आहे,मग सरकार कुणाला पाण्यासाठी कसे वंचित ठेवू शकते असा प्रश्न मानसी नाईक यांनी उपस्थित केला. दीपावलीच्या आंदोलनाला आपला पाठिंबा असून एका बहिणीचा हा संघर्ष पाहून डोळ्यात पाणी आल्याची भावना यावेळी मानसी नाईक यांनी व्यक्त केली..

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.

बाईट:- मानसी नाईक, अभिनेत्री

Conclusion:अहमदनगर- सरकार सेल्फीत मग्न.. मानसी नाईकचा दीपाली सय्यद आंदोलनाच्या निमित्ताने महाजनांना टोला..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.