१९८४ साली ‘अबोध’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली माधुरी दीक्षितने नंतर दोनेक दशके हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य केलं. त्याच सुमारास दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून आलेल्या श्रीदेवीने ‘हिम्मतवाला’मधून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला व नंतर तिनेही दोनेक दशके बॉलिवूडमध्ये टॉपला राहून आपली वेगळी जागा निर्माण केली. खरंतर श्रीदेवी आणि माधुरीमध्ये बॉलिवूडच्या नं. १ हिरॉईनसाठी नेहमीच स्पर्धा होती. परंतु दोघांनीही लग्नानंतर अभिनय सन्यास घेतला व नं. १ हिरॉईन ची जागा रिकामी केली. काही दिवसांपूर्वीच श्रीदेवीची पुण्यतिथी होती व माधुरी दीक्षितने तिला ‘डान्स दिवाने’च्या मंचावर श्रद्धांजली दिली, तिच्या ‘हिम्मतवाला’मधील ‘नयनों में सपना’ या अजरामर गाण्यावर नृत्य करून.
माधुरी दीक्षित थिरकली श्रीदेवीच्या गाण्यावर शोच्या प्रिमियर एपिसोड मध्ये, तिसऱ्या पिढीतील स्पर्धक शिल्पा आणि अजय यांनी ‘नयनों में सपना’ गाण्यावर परफॉर्म केले आणि माधुरीचे हृदय जिंकले आणि माधुरी सुध्दा त्यांच्याबरोबर मंचावर आली आणि स्पर्धकांसोबत या गाण्यावर डौलाने आणि उत्साहाने नाचली. तिची ही श्रीदेवीसाठीची नृत्य-श्रद्धांजली होती.
‘डान्स दिवाने’च्या मंचावर माधुरी दीक्षित नुकताच ‘डान्स दिवाने’चा ग्रँड प्रीमियर एपिसोड शूट झाला व तोही एका जहाजावर. कार्निवल सदृश चकाचक वातावरणात रंगारंग कार्यक्रम सादर होत मनोरंजनाचा खजिना उघडला गेला. शोच्या काही निवडक स्पर्धकांचे डान्सेस झाले तसेच या शोचे जजेस, तुषार कालिया, धर्मेश येलांडे आणि माधुरी दीक्षित यांनीही धमाकेदार परफॉर्मन्सेस पेश केले आणि डान्स दीवानेचा मंच शुभारंभासाठी सज्ज केला.
माधुरी दीक्षित थिरकली श्रीदेवीच्या गाण्यावर शुभारंभाविषयी बोलताना, माधुरी दीक्षित म्हणाली, “अशा प्रकारच्या ग्रँड महोत्सवामुळे मला खूप आनंद झाला आहे आणि डान्स साजरा करणाऱ्या एखाद्या शोचे अशा दिमाखदारपणे आणि मनोरंजक पध्दतीने शुभारंभ करण्यासारखा दुसरा समारंभ काय असणार आहे. आमच्या नव्या परीक्षकांच्या पॅनेल मध्ये धर्मेश येत आहे तर होस्ट म्हणून राघव सामील होत आहे, आम्ही सर्व डान्सर यावेळी येथे आहोत कारण डान्स दीवाने हा मंच खऱ्या अर्थाने डान्स विषयीची आवड साजरी करतो आहे. सहा वर्षांचे मुले सुध्दा किती छान डान्स करतात हे पाहून मी चकित होते. तिसऱ्या पिढीतील स्पर्धक सुध्दा छान परफॉर्मर आहेत हे मला खूप आवडते आहे!"‘डान्स दीवाने’ सुरू होत आहे २७ फेब्रुवारी पासून आणि प्रत्येक शनिवार आणि रविवारी रात्री ९ वाजता कलर्स वर प्रसारित होणार आहे.
हेही वाचा - कंगनासोबत वादग्रस्त ई-मेल प्रकरण; ऋतिक रोशन मुंबई गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर