ETV Bharat / sitara

'डोला रे डोला'वर थिरकल्या माधुरी दीक्षित आणि प्रियंका चोप्रा - Madhuri Dixit and Priyanka Chopra dance on Dola Re Dola

'डान्स दिवाने'च्या सेटवर माधुरी दीक्षित आणि प्रियंका चोप्रा या दोघी एकत्र थिरकताना दिसल्या. 'देवदास' चित्रपटातील 'डोला रे डोला' या गाण्यावर माधुरी आणि प्रियंका नाचल्या.

माधुरी दीक्षित आणि प्रियंका चोप्रा
author img

By

Published : Sep 27, 2019, 5:08 PM IST

मुंबई - माधुरी दीक्षित आणि प्रियंका चोप्राच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या दोन्ही अभिनेत्री सहसा एकाच मंचावर फारशा कधी दिसत नाहीत. पण 'डान्स दिवाने'च्या सेटवर या दोघी एकत्र थिरकताना दिसल्या. 'देवदास' चित्रपटातील 'डोला रे डोला' या गाण्यावर माधुरी आणि प्रियंका नाचल्या. त्यांचे सुंदर पदलालित्य, ठुमका आणि एकंदरीतच सिंक्रोनाईज्ड कोरिओग्राफी उत्तम होती.

माधुरी आणि प्रियंका यांना एकत्र नाचण्याची विनंती होस्टने केल्यानंतर प्रियंका चोप्राची भूमिका असलेल्या 'पिंगा' गाण्याचे म्यूझिक सुरू झाले. यावर दोघीही मनमुराद थिरकल्या. त्यानंतर माधुरीच्या 'देवदास' सिनेमातील प्रसिध्द 'डोला रे डोला' गाण्यावर त्यांनी उत्तम ताल धरला.

प्रियंका चोप्रा सध्या 'स्काइ इज पिंक'च्या प्रमोशनसाठी मेहनत घेत आहे. याचसाठी ती 'डान्स दिवाने'च्या सेटवर पोहोचली होती. माधुरी आणि प्रियंकाचे हे दोन्ही डान्स सध्या व्हायरल झाले आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.