ETV Bharat / sitara

‘1 OTT’ च्या लोगोचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते अनावरण!

आघाडीचा अभिनेता स्वप्नील जोशी आणि प्रख्यात उद्योजक व दानशूर व्यक्तिमत्त्व नरेंद्र फिरोदिया यांचा संयुक्त प्रकल्प असलेले ‘1 OTT’ (ओटीटी : ओव्हर द टोप) हे व्यासपीठ हे सर्व भारतीय भाषांमधील कार्यक्रमांसाठी तयार झाले असून त्याद्वारे तो ‘अपने भारत का अपना मोबाइल टीव्ही’ असणार आहे. हिंदीबरोबरच मराठी, बंगाली आणि इतर भारतीय भाषांमधील कार्यक्रम सादर करत हे व्यासपीठ खऱ्या अर्थाने ‘अपने भारत का अपना मोबाइल टीव्ही’ ठरणार आहे. महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज ‘1 OTT’ या नवीन ओटीटीच्या लोगोचे अनावरण अत्यंत दिमाखदार समारंभात करण्यात आले.

author img

By

Published : Dec 8, 2021, 9:35 PM IST

‘1 OTT’ च्या लोगोचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते अनावरण

स्वप्नील जोशी आज महाराष्ट्रातच नाही तर भारत आणि जगातील कित्येक देशांमध्ये घराघरातील नाव ठरले आहे. त्यांचे चित्रपट आणि मालिका या लोकप्रिय आहेत. त्यांच्या मनात ओटीटी व्यासपीठ सुरु करण्याचे दोन वर्ष घाटत होते. त्याचप्रमाणे प्रख्यात उद्योगपती नरेंद्र फिरोदिया हेसुद्धा भारतीय भाषांसाठी एक ओटीटी असावा अशी योजना अखात होते. या दोघांना एकमेकांच्या या योजनांबद्दल कळले तेव्हा त्या दोघांनी एकत्र येत मोठ्या प्रमाणावरील ओटीटी सुरू करण्याचे ठरवले. त्या माध्यमातून आज ओटीटीच्या क्षेत्रात जे मनोरंजन दिले जाते त्याची व्याख्याच बदलून टाकण्याचे या दोघांनी ठरवले आहे.

महामहीम राज्यपाल 1 OTT लोगोचे अनावरण केल्यानंतर म्हणाले, “ स्वप्नील जोशीजी, नरेंद्र फिरोदियाजी आणि त्यांच्या सर्व चमूचे मी मनापासून अभिनंदन करतो. भारतीय भाषांमधील मनोरंजनासाठी त्यांनी हे अनोखे असे व्यासपीठ दाखल केले आहे. त्यांच्या या प्रयत्नात त्यांना सर्वतोपरी यश मिळो, अशा शुभेच्छा मी त्यांना देतो.”

जोशी आणि फिरोदिया यांच्याबरोबर ‘1 OTT ओटीटी’ मध्ये डीटीएल क्षेत्रातील आघाडीचे नाव विनायक सातपुते संस्थापक सदस्य वेंकटेश श्रीनिवासन, राजीव जानी, प्रख्यात बँकर सतीश उतेकर, मनोरंजन क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तिमत्त्व श्री चेतन मणियार आणि संदीप घुगे यांचा महत्त्वाचा सहभाग आहे.

“गेली दोन वर्षे मी ओटीटी सुरु करण्याचे ठरवत होतो. एक कलाकार म्हणून काहीतरी वेगळे करणे आणि लोकांना काहीतरी वेगळे देणे, हा त्यामागील हेतू होता. दरम्यानच्या काळात मी जेव्हा फिरोदियाजींशी बोललो तेव्हा तेसुद्धा भारतीय भाषांसाठी असेच एक व्यासपीठ सुरु करण्याचे घाटत असल्याचे म्हणाले. गेली कित्येक वर्षे आम्हा दोघांचे अगदी सलोख्याचे संबंध आहेत. चर्चेनंतर आम्ही दोघांनी एकत्र येवून ही योजना मोठ्या प्रमाणावर राबविण्याचे ठरवले,” स्वप्नील जोशी म्हणाला.

“केवळ भारतीय भाषाच नाही तर अगदी परदेशी भाषांमधील कार्यक्रमसुद्धा या व्यासपीठावर भविष्यात दाखल होणार आहेत. या क्षेत्रातील खूप अनुभवी आणि प्रतिभावान लोक आमच्या या प्रकल्पाशी जोडले गेले आहेत. त्यातून एक जागतिक दर्जाचे व्यासपीठ उभे राहत आहे. आज या व्यासपीठाचा शुभारंभ करताना मला अतिशय आनंद होत आहे. देशाच्या विविध भागांतील आणि सामाजिक घटकांमधील लोकांसाठी अगदी ‘हट के’ मनोरंजन देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे,” स्वप्नील पुढे म्हणाला.

नरेंद्र फिरोदिया म्हणाले, “कोविड-१९ लॉकडाउनच्या काळात अनेक ओटीटी व्यासपीठे दाखल झाली आणि त्यांनी विविध प्रकारचे मनोरंजनपर कार्यक्रम सादर करण्याचा प्रयत्न केला. भारत ही ओटीटीसाठी एक मोठीच बाजारपेठ आहे आणि ही बाब गेल्या दोन वर्षांमध्ये सिद्ध झाली आहे. मात्र प्रादेशिक भाषांना या व्यासपीठांवर म्हणावे तसे प्रतिनिधित्त्व मिळत नव्हते. ते मिळवून देण्याच्या उद्देशाने आम्ही ‘1 OTT’ दाखल केले आहे. भारतीय भाषांमधील कार्यक्रम या व्यासपीठावर सादर होणार आहेत. विविध भारतीय भाषांमधील कार्यक्रमांना या व्यासपीठाचा फायदा होणार आहे. ग्रामीण भागातील लोक आजही चांगल्या कार्यक्रमांपासून वंचित राहतात. त्यांना उत्तम पर्याय उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. आम्ही आमच्या प्रेक्षकांना अनेक भारतीय भाषांमधील दर्जेदार मनोरंजन देणार आहोत. त्या माध्यमातून हा भारताचा ओटीटी असणार आहे.”

या ओटीटीवरून जे कार्यक्रम प्रसारित होणार आहेत ते प्रेक्षक त्यांच्या सोयीप्रमाणे पाहू शकतील. म्हणूनच या ओटीटीला ‘अपने भारत का अपना मोबाइल टीव्ही’ असेही संबोधिले जात आहे.

हेही वाचा - ‘कबीर सिंग’च्या यशानंतर शाहिद कपूरचा ‘जर्सी' ३१ डिसेंबरला होणार प्रदर्शित!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.