काही दिवसांपूर्वी मुंबईच्या खड्ड्यांवर आरजे मलिष्काने केलेला रॅप सॉंग सर्वांनीच ऐकला आणि पाहिला असेल. मुंबईतील खड्ड्यांबाबत तिने रेडिओच्या माध्यमातून आवाज उठवला होता. आता कोल्हापुरातील रेडिओ सिटीने सुद्धा अशाच प्रकारे झुम कचरा प्रकल्पाच्या अनेक समस्येवर आवाज उठवला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापुरातील बावडा परिसरात असणाऱ्या झूम कचरा प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांना अनेक आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. झूम प्रकल्पातील विषारी वायूमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने दोन दिवसांपूर्वी प्रदूषण नियंत्रण महामंडळाने नागरिकांना मास्क बांधण्याचे आवाहन केले आहे. पण याबाबत कोणत्याही पद्धतीने उपाययोजना करण्यासाठी पाऊले उचलली नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. यापार्श्वभूमीवर कोल्हापुरातील रेडिओ सिटीने समस्या सांगणारे एक रॅप सॉंग बनविले आहे. कोल्हापूरात मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.