ETV Bharat / sitara

जाणून घ्या, पवन कल्याणच्या चाहत्यांनी का केला राम गोपाल वर्माच्या ऑफिसवर हल्ला? - पॉवर स्टार नावाच्या विडंबन चित्रपटासाठी तोडफोड

अभिनेता पवन कल्याणच्या चाहत्यांनी आणि समर्थकांनी राम गोपाल वर्मा यांच्या ऑफिसची पॉवर स्टार नावाच्या विडंबन चित्रपटासाठी तोडफोड केली.

Pawan Kalyan fans attack Ram Gopal Varma's office
विडंबन चित्रपटासाठी तोडफोड
author img

By

Published : Jul 24, 2020, 8:08 PM IST

हैदराबाद: चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनी तेलुगू सुपरस्टार पवन कल्याणची त्यांच्या चित्रपटातून कथितरित्या खिल्ली उडवल्याचा आरोप पवन कल्याणच्या चाहत्यांचा आहे. राम गोपाल यांच्या चित्रपटात पवन कल्याणचे विडंबन करण्यात आल्याचे समजते. यामुळे नाराज झालेल्या पवन कल्याणच्या चाहत्यांनी याच राम गोपाल वर्मा यांच्या ऑफिसवर हल्ला केला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, चाहत्यांच्या गटाने दगडफेक करून वर्माच्या ऑफिसच्या खिडक्या फोडल्या. पवन कल्याणच्या आयुष्यावर आणि त्याच्या अयशस्वी राजकीय कारकीर्दीवर ‘पॉवर स्टार’ नावाच्या चित्रपटात भाष्य करण्यात आल्याचा पवनच्या चाहत्यांचा आरोप आहे. राम गोपाल वर्माच्या विडंबनात्मक चित्रपटामुळे पवन कल्याणच्या चाहत्यांचा राग उफाळून आला.

राम गोपाल वर्माच्या 'आरजीव्ही वर्ल्ड' या अधिकृत संकेतस्थळावर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून पवन कल्याणचे चाहते वर्मावर सोशल मीडियातून टीका करत आहेत.

हेही वाचा - दुसऱ्यांच्या मुलींना धमक्या का देता? कंगनाच्या टीमचा जावेद अख्तर यांच्यावर हल्ला बोल

हल्ल्यानंतर चित्रपट निर्माता राम गोपाल वर्माने शहरातील ज्युबली हिल्स पोलिसात तक्रार दिली आहे. या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

हल्ल्याबद्दल बोलताना वर्मा म्हणाले, “हा लोकशाही देश आहे आणि मला चित्रपट बनविण्याचा अधिकार आहे. मी हा कल्पनारम्य चित्रपट बनवला असून कोणाशीही संबंधित नाही, असे सांगत राहिलो, परंतु तरीही त्यांनी गोंधळ घातला. माझ्या व्यासपीठावर हा चित्रपट प्रदर्शित करण्यास कोणी मला रोखू शकत नाही. "

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.