ETV Bharat / sitara

किशोर कुमार यांच्या पहिल्या पत्नी रुमा गुहा ठाकुरता याचं निधन - passes away

रूमा यांनी अनेक बंगाली चित्रपटात काम केले आहे.  त्यांचा बालिका बधु हा बंगाली चित्रपट विशेष गाजला होता.

Kishor Kumar first wife Ruma guha Thakurta passes away
author img

By

Published : Jun 3, 2019, 1:57 PM IST

मुंबई - गायक किशोर कुमार यांच्या पहिल्या पत्नी तसेच सुप्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या रूमा गुहा ठाकुरता यांचे आज (३ जून) निधन झाले आहे. त्या ८४ वर्षांच्या होत्या. कोलकातातील आपल्या निवासस्थानी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

अलिकडेच रूमा या त्यांचा मुलगा अमित कुमार यांच्या भेटीसाठी मुंबईला आल्या होत्या. तीन महिन्यांपासून त्या त्याच्या मुलाकडेच राहत होत्या. त्या बऱ्याच दिवसांपासून आजारी देखील होत्या.
रूमा यांनी किशोर कुमार यांच्याशी १९५१ साली लग्न केले होते. मात्र, त्यांच्या नात्यात दुरावा आल्याने ते एकमेकांपासून वेगळे झाले. लग्नाच्या अवघ्या ६ वर्षातच त्यांनी घटस्फोट घेतला होता. दरम्यान, त्यांना एक मुलगा झाला. त्याचे नाव अमित कुमार असे आहे. अमित हे देखील गायक आहेत.

रूमा या एकेकाळी प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यामुळे लग्नानंतर त्या पूर्णवेळ संसाराला देऊ शकत नव्हत्या. याचमुळे किशोर कुमार आणि त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले होते. रूमा यांनी किशोर कुमार यांच्याशी घटस्पोट घेतल्यानंतर अरूप गुहा ठाकुरता यांच्याशी लग्नगाठ बांधली होती.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.