मुंबई - अभिनेत्री कियारा अडवाणी सोशल मीडियावर सध्या खूप चर्चेत आहे. तिचा एक व्हिडिओ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाय. यात ती 'सौदा खरा खरा' या पंजाबी गाण्यावर थिरकताना दिसत आहे. तिने करिना कपूरचा भाऊ आणि बॉलिवूड अभिनेता अरमान जैनच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये हा परफॉर्मन्स केला होता.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अरमान जैन आणि अनिसा मल्होत्रा यांचा विवाह ३ फेब्रुवारी रोजी पार पडला. त्यानंतर मुंबईत रिसेप्शन सोहळा पार पडला. यावेळी बॉलिवूडचे असंख्य तारे-तारका उपस्थित होते. करिना, करिश्मा, शाहरूख, तारा सुतारिया यांच्यासह अनेकांनी यावेळी आपले परफॉर्मन्स सादर केले. यात कियाराचा डान्सही खूप चर्चेचा विषय ठरला.
कियाराच्या या डान्स व्हिडिओला वुम्पलाने शेअर केला असून सुमारे २७ हजारहून अधिक वेळा पाहण्यात आलाय. कामाचा विचार करता कियाराने आपल्या आगामी 'इंदू की जवानी' सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. सेटवरचा एक व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.