मुंबई - कोरोना विषाणूमुळे देशभरात लॉक डाऊन आणि जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर कलाविश्वातील कलाकार घरात कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहेत. कोरोनामुळे चित्रपटांचे शूटिंग पुढे ढकलल्यामुळे सर्व कलाकार घरी बसलेले आहेत. मात्र, रिकाम्या वेळेत काय करावे, असा प्रश्न त्यांनाही पडला आहे. त्यामुळे कलाकार घरकामात करण्यात आपला वेळ घालवत आहेत. बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री कॅटरिना कैफने तर, चक्क पाण्याचा कमी वापर करून भांडी कशी घासावी, याचे धडेच सोशल मीडियाच्या माध्यमातून दिले आहेत.
कॅटरिनाचा भांडी घासतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कॅटरिनाच नाही, तर अभिनेता कार्तिक आर्यन देखील घरातील भांडी घासण्याचे काम पूर्ण करत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
कॅटरिना आणि कार्तिकच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
कॅटरिना कैफच्या व्हिडिओवर अर्जून कपूरची प्रतिक्रिया -
दरम्यान कॅटरिनाच्या व्हिडिओवर अभिनेता अर्जून कपूरची कमेंटही व्हायरल होत आहे. त्याने कॅटरिनाला चक्क 'कांताबेन २.०', असे नाव दिले आहे. तर माझ्याही घरी भांडी घासायला ये, असे म्हटले आहे.
त्याच्या या कमेंटनंतर अनेकांनी त्याला ट्रोल केले आहे. तर, काहींनी त्याच्या विनोदबुद्धीची प्रशंसाही केली आहे.