ETV Bharat / sitara

भन्साळींच्या 'हिरा मंडी'मधून कार्तिक आर्यन करणार ओटीटी पदार्पण? - संजय लीला भन्साळी हिरा मंडी ही वेब सिरीज

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन डिजीटल दुनियेत पदार्पण करणार आहे. संजय लीला भन्साळी यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्प हीरा मंडी या वेब शोद्वारे ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहे.

SLB's pet project Heera Mandi
संजय लीला भन्साळी
author img

By

Published : Feb 1, 2021, 1:06 PM IST

मुंबई - बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी डिजीटल दुनियेत पदार्पण केले आहे. या यादीत आता कार्तिक आर्यनचाही समावेश होणार आहे. संजय लीला भन्साळी यांच्या आगामी हिरा मंडी या वेब शोमधून कार्तिक पदार्पण करीत आहे.

संजय लीला भन्साळींच्या मेगा बजेट असलेल्या वेब सिरीजमध्ये कार्तिक आर्यन भाग घेत असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. यापूर्वी भन्साळी यांनी प्रियंका चोप्राला घेऊन एक चित्रपट बनवण्याची तयारी सुरू केली होती. त्यांच्या या आगामी शोमध्ये सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशीही सहभागी होणार आहेत. तसेच विद्या बालनचीही निवड वेब सिरीजसाठी करण्यात आल्याची चर्चा मनोरंजन जगतात आहे.

संजय लीला भन्साळी हिरा मंडी ही वेब सिरीज नेटफ्लिक्ससाठी बनवणार आहेत. २०२१ च्या पहिल्या तिमाहीत या शोचे शुटिंग सुरू होईल. काही दिवसापूर्वी कार्तिक आर्यनने या शोसंबंधी भन्साळी यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली होती.

हेही वाचा - सिद्धार्थने केला ‘थँक गॉड’ मधील लूक शेअर; चाहतांच्या भन्नाट प्रतिक्रिया

दरम्यान, कार्तिक आर्यन आगामी 'भूला भुलैया 2' या विनोदी चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये कियारा अडवाणीच्यासोबत तो दिसणार आहे. याशिवाय आगामी ‘धमाका’ या चित्रपटात अभिनेता एका वेगळ्या अवतारातही दिसणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.