‘बिग बॉस १५’ कलर्स वर सुरु होण्याआधी ‘बिग बॉस ओटीटी’ प्रेक्षकांच्या भेटीला आलाय जो २४ तास त्यांना बघता येतो वूट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर. बिग बॉसमध्ये दिसणारा नेहमीच्या मालमसाल्याने तो भरलेला असून प्रेक्षकांचा पाठिंबाही मिळवितोय. या बीबी-पूर्व-पर्वाचे सूत्रसंचालन करतोय बॉलिवूडचा प्रथितयश निर्माता व दिग्दर्शक करण जोहर. तो पहिल्यांदाच बिग बॉसचे होस्टिंग करतोय आणि जर त्याच्या सोबत अजून एका अभिनेत्याला होस्टिंगसाठी बोलावयाचे असेल तर कोणाला बोलावशील या प्रश्नावर त्याने ‘या’ कलाकारासोबत को-होस्टिंग करायला मजा येईल असा उलगडा केला.
बिग बॉस ओटीटीचे होस्ट करण जोहर म्हणाला की, त्याला हरहुन्नरी अभिनेता रणवीर सिंगसोबत शोचे को-होस्टिंग करण्यास नक्की आवडेल. रणवीर सिंग त्याच्या संसर्गजन्य एनर्जी साठी जाणला जातो आणि जर का तो करण जोहरसोबत को-होस्टिंग करायला आला तर धमाल उडवून देईल यात शंकाच नाही. 'बिग बॉस ओटीटी'ची घोषणा करण्यात आल्यापासून शोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि शोचे नवीन स्वरूप, स्पर्धक आणि विशेषत: होस्टसह भारतभरातील प्रेक्षकांना आकर्षून घेतले. त्यातच को-होस्ट रणवीर असेल तर शोला चार चांद लागतील.
प्रत्येकजण करण जोहर यांनी शोमध्ये आणलेल्या एक्सट्रा ऊर्जेसंबंधी चर्चा करत आहेत. करणला त्याचा को-होस्ट म्हणून कोणासोबत काम करायला आवडेल याबाबत विचारले असता त्याने प्रांजळपणे रणवीर सिंगचे नाव घेतले. करण म्हणाला, ''रणवीर हा बॉलिवुड इंडस्ट्रीतील ऊर्जा व मनोरंजनाचा पॉवरहाऊस आहे आणि त्याला पाहणे व त्याच्यासोबत गप्पागोष्टी करणे ही एक पर्वणीच आहे. तो या भूमिकेसाठी अगदी योग्य आहे, कारण तो ओव्हर दि टॉप, अद्वितीय, मनोरंजनपूर्ण आणि नेहमीच स्वत:च्याच उत्साहामध्ये असतो, जे शोसाठी आवश्यक आहे.''
रणवीर सिंग, करण जोहर दिग्दर्शित, ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ मध्ये आलिया भट समवेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
ओटीटी वर २४ तास दिसणाऱ्या 'बिग बॉस ओटीटी' मधील सर्व ड्रामा, धमाल व मनोरंजन दर सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ७ वाजता आणि रविवार रात्री ८ वाजता फक्त वूटवर पाहायला मिळते.
हेही वाचा - अहान शेट्टीच्या पदर्पणीय ‘तडप’ची प्रदर्शन-तारीख झाली जाहीर!