मुंबई - बिग बॉस ओटीटी या रिअॅलिटी शोमध्ये सिद्धार्थ शुक्लाची आठवण जागवण्यात आली. यावेळी चित्रपट निर्माता, दिग्दर्शक म्हणाला की, सिध्दार्थच्या निधनाने सर्वांना सुन्न केले आहे. बालिका वधू या गाजलेल्या मालिकेतून आणि बिग बॉस या शोमुळे सिध्दार्थचे नाव देशातील घराघरात पोहोचले होते. अशा या उभरत्या सिताऱयाचे गुरुवारी वयाच्या 40 व्या वर्षी निधन झाले. करण जोहर होस्ट करीत असलेल्या बिग बॉस ओटीटीमध्ये सिध्दार्थ शुक्लाचा व्हिडिओ मोंटाज दाखवण्यात आला. बिग बॉसमध्ये त्याने गाजवलेला काळ व त्याच्या इतर आठवणी यावेळी व्हिडिओतून जागवण्यात आल्या. यावेळी करण जोहरने भावूक होऊन सिध्दार्थला श्रध्दांजली वाहिली.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
"सिद्धार्थ शुक्ला हे नाव आमच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनले होते. तो बिग बॉस कुटुंबातील आवडता सदस्य होता. एक मित्र, केवळ माझ्यासाठीच नाही तर आमच्या उद्योगातील इतरांचाही तो मित्र होता. तो आम्हाला अचानक सोडून निघून गेला.", असे करण म्हणाला.
सिध्दार्थ शुक्लाबद्दल बोलताना करण जोहर गहिवरला आणि म्हणाला की दिवंगत अभिनेत्याचा वारसा कायम राहील. " त्याचा मृत्यू ही अशी एक गोष्ट आहे ज्यावर अजूनही आपला विश्वास बसत नाही. मी सुन्न झालो आहे, माझा श्वास अडखळतोय.
"सिद एक चांगला मुलगा, एक चांगला मित्र आणि आसपास आणि सोबत राहण्यासाठी एक ग्रेट माणूस होता. त्याने सकारात्मक उर्जा आणि हास्याने लाखोंची मने जिंकली. सिध्दार्थला शांती मिळो, मी तुला कायमचा हरवून बसलोय.", असेही करण पुढे म्हणाला.
सिद्धार्थ शुक्लाची कारकिर्द
सिद्धार्थ शुक्ला अभिनेता, मॉडेल आणि होस्ट होता. त्याने एक मॉडेल म्हणून आपल्या करियरला सुरुवात केली होती. 2008 च्या ‘बाबुल का आंगन छुटे ना’ या शोमधील मुख्य भूमिकेतून त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 2014 मध्ये, शुक्लानं ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मध्ये सहाय्यक भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तर ब्रोकन बट ब्यूटीफुल 3’, ‘बालिका वधू’ आणि ‘दिल से दिल तक’मधील भूमिका त्याने अत्यंत उत्तमरित्या पार पाडल्या होत्या. याचबरोबर त्याने सावधान इंडिया आणि इंडियाज गॉट टॅलेंट हे शो होस्ट केले होते. बिग बॉस १३ आणि फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी या रिऍलिटी शोचे तो विजेते होता. येथून तो फारच प्रसिद्ध झाला होता.
शेहनाझ गिल आणि सिद्धार्थची जोडी -
बिग बॉस 13 मध्ये शेहनाझ गिल आणि सिद्धार्थची जोडी खूप गाजली होती. यातच डिसेंबर 2020 मध्येच सिद्धार्थ व शहनाज गिलने सीक्रेट मॅरेज केल्याच्याची चर्चा रंगल्या होत्या. मात्र, ही फक्त अफवा असल्याचे सिद्धार्थने स्पष्ट केले होते. चाहत्यांनी त्या दोघांच्या जोडीला सीडनाझ असे नाव दिले होते.
सिद्धार्थची आकर्षक पर्सनॅलिटी, त्याचे मोहक स्माईल आणि सहज अभिनय शैलीमुळे तो प्रेक्षकांचा लाडका होता. आधी लोकप्रिय मालिका आणि नंतर बिग बॉस व खतरों के खिलाडी यासारख्या कार्यक्रमांत भाग घेतल्यानंतर तर त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढली होती.
हेही वाचा - सिद्धार्थ शुक्लाच्या शोकसभेत त्याच्या फॅन्सना सहभागी होण्याची संधी!