मुंबई - प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा हा देश आणि जगात एक मोठा पब्लिक फिगर बनला आहे. त्याच्या तोंडून निघणारा प्रत्येक शब्द बातम्यांचा विषय ठरतो. सोशल मीडियावर कपिल शर्माचा एक व्हिडिओ प्रसिध्द झाला आहे. या व्हिडिओमध्ये कपिल गिनीला प्रपोज केले तेव्हा तो दारूच्या नशेत असल्याचे सांगत आहे. हा व्हिडिओ नेटफ्लिक्स ( Netflix ) स्टँड-अप स्पेशल आई एम नॉट डन यट ( I am Not Done Yet ) या मालिकेतील आहे. व्हिडिओमध्ये कपिल शर्मा फोन कॉलवर गिनीशी लग्न कसे केले हे सांगतांना दिसत आहे. प्रपोज करण्याची हिंमत एकवटण्यासाठी त्याने दारूचा अवलंब केला होता. त्यासोबतच तो एका ब्रँडचे आभारही मानत आहे
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
जवळपास एक मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये कपिलने दारूच्या नशेत गिन्नीला लग्नासाठी कसे प्रपोज केले याचा खुलासा केला आहे. सर्व अभिनेत्रींमध्ये गिन्नी ही त्याची आवडती असल्याचे सांगताना कपिल म्हणाला, ''मी तिच्यावर खूप काम सोपवत असे. ती मला फोन करून सांगायची की आज काय घडलं आणि रिहर्सल कशी झाली वगैरे.''
नंतर त्याने सांगितले की, एके दिवशी तो दारूच्या नशेत असताना त्याला गिन्नीचा फोन आला. कपिल म्हणाला, 'मी कॉल उचलताच मी तिला विचारले, 'तुझे माझ्यावर प्रेम आहे का?' ती चकित झाली आणि म्हणाली, 'काय?' त्याला वाटले, 'या माणसाला विचारण्याची हिम्मत कशी झाली?' सुदैवाने मी तसे केले नाही. देवाचे आभार मानतो कारण मी त्या दिवशी ताडी प्यालो, नाहीतर प्रश्न वेगळा असता. मी तिला विचारले असते, 'गिन्नी, तुझ्या वडिलांना ड्रायव्हरची गरज आहे का?'
कपिलने प्रेक्षकांमध्ये बसलेल्या पत्नी गिन्नीला काही बोलायला सांगितले. गिन्नीशी बोलताना कपिल म्हणाला, 'तू एका स्कूटर मालकाच्या प्रेमात कशी काय पडलीस?' त्यावर गिन्नी हसली आणि म्हणाली, 'मला वाटले प्रत्येकजण श्रीमंत माणसाच्या प्रेमात पडतो. मला वाटलं या गरीबाचं भलं करावं'. गिन्नीच्या या उत्तरावर सगळेच हसले.
हेही वाचा - आराध्याने केला ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनसोबत डान्स