मुंबई - अभिनेत्री कंगना रनौतने आता आपल्या विरोधात पाठविलेल्या कायदेशीर नोटीसला प्रतिसाद दिला आहे. तिच्याविरोधात कायदेशीर नोटीस बजावण्याच्या मुद्द्यावर आपले मत व्यक्त करताना कंगनाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केले आहे की, "फिल्म माफियांनी माझ्यावर अनेक गुन्हे दाखल केले आहेत. काल रात्री जावेद अख्तरने आणखी एक गुन्हा दाखल केला. महाराष्ट्र सरकार दर तासाला खटला दाखल करीत आहे आणि आता पंजाबमध्ये कॉंग्रेस देखील या गटामध्ये सामील झाली आहे ... मला वाटते की हे फक्त मला महान करुनच सोडतील."
हेही वाचा -कंगना रणौतला कायदेशीर नोटीस, अभद्र ट्विटवर माफी मागण्याची शीख संस्थेने केली मागणी
याखेरीज, दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीनेही शुक्रवारी कंगनाला कायदेशीर नोटीस पाठविली आहे. त्यांनी कंगनाकडे कृषी कायदे रद्द केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणार्या शेतकरी आणि कार्यकर्त्यांविरूद्ध केलेल्या 'अपमानकारक ट्वीट'बद्दल माफी मागण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा -कंगना- दिलजीतच्या ट्विटर युध्दात स्वरा भास्करची एन्ट्री