मुंबई - अभिनेत्री रेणुका शहाणे दिग्दर्शित आगामी ‘त्रिभंगा’ चित्रपटाचा एक इंटरेस्टिंग टीझर काजोलने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तीन अचाट क्षमतेच्या महिलांची ही कथा असल्याचे टिझरवरुन लक्षात येते.
व्हिडिओ शेअर करताना, काजोलने लिहिले, "त्रिभंगा, मतलब, तेढी, मेढी, खट्याळ परंतु मादक. त्रिभंगा, प्रीमियर १५ जानेवारी रोजी फक्त नेटफ्लिक्सवर. त्रिभंगाचा २० सेकंदाचा टीझर इमोशन्समध्ये अधिक आहे आणि संवाद नसतानाही लक्ष वेधून घेतो."
दैनंदिन जीवनात कुटुंबाचे महत्त्व जाणवणाऱ्या हृदयस्पशी कथेत काजोल ओडिसी नृत्यांगना साकारताना दिसणार आहे.
काजोल या चित्रपटातून डिजिटल पदार्पण करीत असून 'त्रिभंगा'मध्ये तन्वी आझमी, कुणाल रॉय कपूर आणि मिथिला पालकर यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
हेही वाचा - स्वागत २०२१ : बॉलिवूडचे हे चित्रपट करणार बॉक्स ऑफिसवर धमाका
अजय देवगण फिल्म्सने बॅन्जय आशिया आणि अल्केमी प्रॉडक्शनसह त्रिभंगाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचा प्रीमियर नेटफ्लिक्सवर १५ जानेवारीला होणार आहे.
हेही वाचा - नवं वर्ष कोरोनामुक्त जावो : अभिनेत्री तेजस्विनी लोणारी