ETV Bharat / sitara

तिवरे दुर्घटना वध की खून? अभिनेता जितेंद्र जोशीचा सवाल - died

अवघ्या 20 वर्षापूर्वी बांधलेलं तिवरे धरण फुटतं? 9 जण मृत्युमुखी! 24 जण बेपत्ता..आसपासच्या गावकऱ्यांनी तक्रार करूनही याची दखल घेतली गेली नाही. हा वध आहे की खून?? की दुर्लक्षिलेला मृत्यु!! असा संतप्त सवाल त्याने ट्विटच्या माध्यमातून केला आहे.

अभिनेता जितेंद्र जोशी
author img

By

Published : Jul 4, 2019, 1:11 PM IST

मुंबई - चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याने झालेल्या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला. या घटनेत २३ जण बेपत्ता झाले होते. यातील १४ जणांचे मृतदेह मिळाले आहेत. तर एनडीआरएफच्या पथकाची शोध मोहिम सुरू आहे. या घटनेनंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. यात कलाकारांचाही समावेश आहे.

नुकतंच मराठमोळा अभिनेता जितेंद्र जोशीने ट्विटर अकाऊंटवरून ट्विट शेअर करत काही सवाल केले आहेत. अवघ्या 20 वर्षापूर्वी बांधलेलं तिवरे धरण फुटतं? 9 जण मृत्युमुखी! 24 जण बेपत्ता..आसपासच्या गावकऱ्यांनी तक्रार करूनही याची दखल घेतली गेली नाही. हा वध आहे की खून?? की दुर्लक्षिलेला मृत्यु!! असा संतप्त सवाल त्याने आपल्या ट्विटच्या माध्यमातून केला आहे.

  • अवघ्या 20 वर्षापूर्वी बांधलेलं
    तिवरे धरण फुटतं?
    9 जण मृत्युमुखी!
    24 जण बेपत्ता..
    आसपासच्या गावकर्यांनी तक्रार करूनही याची दखल घेतली गेली नाही. हा वध आहे की खून?? की दुर्लक्षिलेला मृत्यु!!

    — jitendra shakuntala joshi (@jitendrajoshi27) July 3, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जितेंद्रच्या या मताला सहमती देत अभिनेता मिलिंद पाटीलनेही ट्विट केलं आहे. आता राजकारणी येतील आणि मदत जाहीर करून उपकार केल्याच्या आविर्भावात निघून जातील. त्यावर ठोस निर्णय होणार नाही, कारण त्यांच्या लेखी गरिबाला किम्मत नाही, असे त्याने म्हटले आहे. दरम्यान एखाद्या सामाजिक विषयावर ट्विट करण्याची ही जितेंद्र जोशीचं पहिली वेळ नाही. याआधीही त्याने अनेक विषयांवर ट्विट करत समाजातील वास्तव मांडलं आहे. मात्र, यामुळे बहुतेकदा त्याला नेटकऱ्यांच्या टीकांची सामनाही करावा लागला आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.