‘रंग माझा वेगळा’ मालिकेत दीपा-कार्तिक चा प्रवास घटस्फोटाच्या मार्गावर जाण्याची शक्यता आहे. सासूबाईंची खंबीर साथ असली तरी कार्तिकचा गैरसमज इतक्या टोकाला गेला आहे की त्याने आता दीपाला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या दीपावर त्याने जीवापाड प्रेम केलं त्याच दीपापासून विभक्त होण्याचं त्याने ठरवलं आहे. श्वेताच्या षडयंत्राला बळी पडत दीपापासून दूर जाण्याची वेळ कार्तिकवर आली आहे.
‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील दीपा-कार्तिकच्या नात्यातली कटुता जुळ्या मुलींच्या जन्मानंतर तरी दूर होईल असं वाटत होतं. सौंदर्याने पुढाकार घेत या दोघांमधले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर दीपाची एक मुलगी आपल्या घरात आणून कार्तिकचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती बदलण्याचं नाव घेत नाहीय. त्यामुळे दीपा-कार्तिक आणि त्यांच्या मुलींच्या नात्याचं भवितव्य नेमकं काय असणार याची उत्सुकता आता वाढली आहे.
स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. दीपाने दोन जुळ्या मुलींना जन्म दिलाय खरा पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच आहे. जन्मानंतर दीपाचं एक बाळ तिच्यापासून दूर झालंय. तर दुसऱ्या बाळाचं पितृत्वच तिच्या वडिलांनी म्हणजेच कार्तिकने नाकारलं आहे. त्यामुळे दीपाने आता माझी मुलगी वडिलांच्या नावाची भीक मागणार नाही असं ठमकावून सांगत एकटीने मुलीला वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
‘रंग माझा वेगळा’ ही मालिका स्टार प्रवाहवर प्रसारित होते.
हेही वाचा - 'जी ले जरा' : प्रियांका चोप्रा जोनास, कॅटरीना कैफ आणि आलिया भट्ट निघताहेत रोड ट्रीपवर!