ETV Bharat / sitara

'इंडियन आयडॉल १२'ची सायली कांबळे आशा भोसलेंच्या हाताचे ठसे ठेवणार घरातील देव्हाऱ्यात!

'इंडियन आयडॉल १२'ची स्पर्धक सायली कांबळे हिने कार्यक्रमात पाहुण्या म्हणून आलेल्य आशा भोसले यांना विनंती केली त्यांच्या हातांचे ठसे तिला हवे आहेत. ‘देश की बेटी’ सायलीची ही इच्छा आशाजींनी आनंदाने पूर्ण केली. आपले दैवत असलेल्या आशा भोसलेच्या हातांचे ठसे मिळाल्यावर सायलीचा उर भरून आला. हे ठसे ती देव्हाऱ्यात पुजणार आहे.

Sayali Kamble took Asha Bhosle's handprints
'इंडियन आयडॉल १२' मध्ये आसा भोसले
author img

By

Published : Jul 10, 2021, 3:27 PM IST

सध्या अनेक कारणांसाठी, त्यात उत्तम गायकीसुद्धा आली, गाजत असलेला इंडियन आयडॉल सिझन १२ हा कार्यक्रम खूप चर्चेत आहे. या विकेंडला भारतीय चित्रपटसृष्टीतील एकमेवाद्वितीय गायिका आशा भोसले या मंचावर हजेरी लावणार आहे. ‘आशा भोसले’ स्पेशल भाग सादर होणार असून त्यात सर्व स्पर्धक आशाजींची अजरामर गाणी सादर करतील. या शोचे स्पर्धक, परीक्षक आणि प्रेक्षक यांना भारून टाकत संगीताची महाराणी खुद्द आशा भोसले या कार्यक्रमात हजेरी लावणार आहे. सर्वांनीच आशाजींचे आशीर्वाद मिळवले पण ‘देश की बेटी’ सायली कांबळेला आशाजींकडून एक मौल्यवान क्षण मिळाला.

Indian Idol 12 contestant Sayali Kamble took Asha Bhosle's handprints
'इंडियन आयडॉल १२' मध्ये आसा भोसले

आपल्या आदर्श व्यक्तींची स्मृती आपल्याजवळ ठेवण्याचे प्रत्येकाचे आपापले मार्ग असतात. कोणी त्यांचे फोटो ठेवते तर कोणी स्वाक्षरी. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉलच्या आगामी भागात या संदर्भात एक वेगळीच गोष्ट बघायला मिळाली. सायलीने ‘दैया ये मैं कहां आ फंसी’, ‘खतूबा’ आणि ‘हंगामा हो गया’ ही गाणी दमदारपणे सादर केल्यावर तिला आशाजींनी कौतुकाच्या रूपात आशीर्वाद दिले. ‘दैया ये मैं कहां आ फंसी’ गाणे गायला किती कठीण आहे हे आशाजींनी नमूद केले आणि त्याच वेळी सायलीने ते छान निभावले असेही सांगितल्यावर सायलीला आकाश ठेंगणे वाटले.

सायली सर्व प्रकारची गाणी गाते परंतु तिची आशा भोसलेची गाणी हातखंडा आहेत. आशाजी हा सायलीचा आदर्श, तिचे दैवत आहेत आणि त्यांचा वरदहस्त आपल्यावर सदैव असावा ही तिची इच्छा आहे. आशाजींच्या हातांचे ठसे घेऊन ते आपल्या घरी देव्हार्‍याच्या शेजारी ठेवण्याची आपली इच्छा तिने बोलून दाखवली. ‘देश की बेटी’ सायलीची ही इच्छा आशाजींनी आनंदाने पूर्ण केली. आपले दैवत असलेल्या आशा भोसलेच्या हातांचे ठसे मिळाल्यावर सायलीचा उर भरून आला.

या खास क्षणानंतर सायली कांबळे म्हणते, “माझ्यासाठी आशाजी म्हणजे देवच आहेत. म्हणूनच त्यांच्या हाताचे ठसे माझ्यासाठी अत्यंत पूजनीय आहेत. हे ठसे मी माझ्या घरी देवघराच्या शेजारीच ठेवीन. मी जेव्हापासून संगीत क्षेत्रात कारकीर्द करण्याचे ठरवले, तेव्हापासून मी बहुतांशी आशाजींचीच गाणी गात आलेय. आशाजींसमोर गाणे सादर करण्याचे माझे पाहिल्यापासून स्वप्न होते आणि इंडियन आयडॉल १२ मुळे ते पूर्ण होऊ शकले. आज मला जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटते आहे.”

इंडियन आयडॉल सिझन १२ हा कार्यक्रम सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर दर वीकएंडला रात्री ९.३० वाजता प्रसारित होतो.

हेही वाचा - नितीन गडकरी यांच्या खासदारकीला नाना पटोलेंचे न्यायालयात आव्हान; सुनावणी ६ ऑगस्टला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.