कमी वोट्स मिळाल्यामुळे बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi)घरामधून स्नेहा वाघ घराबाहेर (Sneha Wagh out of Bigg Boss)पडली. सुरू झालेल्या नव्या आठवड्यात नवे टास्क रंगणार तसेच राडे सुद्धा होणार. आता बिग बॉस मराठीच्या घराचे मुंबई शहारात रूपांतर होणार आहे. त्यानुसार बिग बॉस यांनी सदस्यांना नवा आणि कठीण टास्क दिला. त्यांनी जाहीर केले, मुंबई हे शहर कधीच झोपत नाही. त्यामुळे या आठवड्यात सगळ्यांना जागं राहावं लागणार आहे. हे ऐकताच सदस्यांची झोप उडाली हे नक्की.
बिग बॉस मराठीच्या घरामधून स्नेहा वाघ बाहेर पडली आणि त्याच संदर्भात विकास आणि विशालमध्ये एक चर्चा चांगलीच रंगली. विकास म्हणाला की, स्नेहा नॉमिनेट त्याच्यासाठी झाली होती आणि आता जय कुठेतरी कारणीभूत ठरला आहे ती बाहेर जाण्यासाठी. आता नॉमिनेशन टास्कमध्ये या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये कोण नॉमिनेट होणार आणि कोण सेफ होणार याच संदर्भात विकास आणि विशाल तर दुसरीकडे जय, मीरा आणि उत्कर्षची चर्चा झाली.
![बिग बॉस मराठी-3](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-bigg-boss-marathi3-mumbai-city-task-mhc10001_23112021023730_2311f_1637615250_859.png)
जयचे म्हणाला, ‘पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही मला आणि दादूसला तर नॉमिनेट करणार नाही. जो नॉमिनेट झालेला सदस्य आहे तो तुमच्यासोबत धावणार... परत दुसर्या राऊंडमध्ये तुमच्याकडेच येणार आहे. तुम्हांला दोघांनाच उचलायचे आहे ते. नॉमिनेट सदस्य असूनदेखील तुम्ही उचल तर तुम्ही आम्हांला नॉमिनेट नाहीच करणार. तुम्ही यांच्यामधलं एक ट्राय करणार ना?’ त्यावर उत्कर्ष म्हणाला, ‘fair आहे तू पळ...’ आणि मीरा म्हणाली, ‘मी धावणार पण...’ . नंतर जय म्हणाला, ‘सोनालीला कर हा ...’ त्यावर मीरा म्हणाली, ‘मी तेच करणार आहे’ आणि उत्कर्ष म्हणाला, ‘तिच उचलणार कोण हा मुद्दा आहे...’ त्यावर जय म्हणाला, ‘कोणीपण उचलू दे ...’. विकास विशालला सांगताना दिसला, ‘मला असं वाटतं तो सोनाली किंवा मीनलला करेन.’
![बिग बॉस मराठी-3](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-bigg-boss-marathi3-mumbai-city-task-mhc10001_23112021023730_2311f_1637615250_13.png)
बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होतो.
हेही वाचा - 'जय भीम'च्या दिग्दर्शकाने मागितली माफी, जाणून घ्या काय आहे प्रकरण...