ETV Bharat / sitara

“मी ‘बिग बॉस’ शोचा हिस्सा नाही आणि होणार देखील नाहीये” : अंकिता लोखंडे! - Ankita Lokhande will be a part of 'Bigg Boss'

गेल्या वर्षी ‘लाइमलाईट’ मध्ये असलेली सुशांत सिंहची माजी गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे ‘बिग बॉस’चा हिस्सा होणार आहे अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे सुशांत सिंहला न विसरलेले तिला सोशल मीडियावर ट्रोल करू लागले. तिला हे समजल्यावर अंकिताने सोशल मीडिया वरून सर्वांना कळविले की ती ‘त्या’ शो चा हिस्सा नाही आणि होणार देखील नाहीये. “मी ‘बिग बॉस’ शोचा हिस्सा नाही आणि होणार देखील नाहीये” : अंकिता लोखंडे!

Statement by Akita Lokhande
अंकिता लोखंडे
author img

By

Published : Jun 28, 2021, 7:02 PM IST

गेल्यावर्षी सुशांत सिंह राजपूतचे संशयास्पद निधन झाले आणि बॉलिवूडमध्ये सर्वत्र खळबळ माजली. ती आत्महत्या होती की हत्या होती यावर अनेक तर्कवितर्क करण्यात येत होते आणि शेवटी ती केस सीबीआयकडे सोपविण्यात आली असून अजूनही त्याबद्दल काहीही निर्णय झालेला नाहीये. सुशांतने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून मनोरंजनसृष्टीत अल्पावधीतच भरपूर प्रसिद्धी मिळविली होती आणि नंतर काही वर्षांनी सर्वात लोकप्रिय असलेली ती मालिका सोडून चित्रपटांकडे मोर्चा वळविला होता. त्यात त्याला यशही मिळाले कारण ‘काय पो छे’ पासून सुरुवात झालेली त्याची कारकीर्द उत्तम चालली होती. परंतु काळाने त्याच्यावर अकाली झडप घातली आणि तो अनंतात विलीन झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याची एके काळची प्रेयसी अंकिता लोखंडे बरीच लाइमलाईटमध्ये आली.

Akita Lokhande
अंकिता लोखंडे

खरंतर, ‘पवित्र रिश्ता’ मालिकेची लोकप्रियता गगनाला भिडत होती आणि त्याच मालिकेमुळे अंकिता लोखंडे छोट्या पडद्यावरील खूप मोठी स्टार बनली होती. सुशांत बरोबर तिची पडद्यावर आणि खऱ्या आयुष्यातही जोडी जमली होती आणि ती जोडीसुद्धा खूप लोकप्रिय झाली होती. दोघेही एकमेकांच्या प्रचंड प्रेमात होते आणि एका डान्स रियालिटी शोमध्ये सुशांतने अंकिताला लग्नाची मागणी घातली होती व तिनेही होकार दिला होता. सुशांत मोठा स्टार बनत होता त्यामुळेच लग्न करायचे आहे आणि सुशांत बरोबर संसार थाटायचा आहे म्हणून अंकिताने आपल्या करियरला रामराम केला होता. ते एकत्र ‘लिव्ह-इन’मध्ये राहत होते. परंतु चांगल्या गोष्टींना नजर लागते म्हणतात तशी त्यांच्या नात्याला नजर लागली आणि ते वेगळे झाले. यामुळेच सुशांतच्या मृत्यूनंतर संपूर्ण प्रेस जगताने तिला अनेक गोष्टी विचारल्या होत्या आणि तिनेही निर्भीडपणे सर्व प्रश्नांची उत्तरं दिली होती. ‘सुशांतचे भविष्यासाठी अनेक प्लॅन्स होते आणि तो आत्महत्या करूच शकत नाही’ हे तिचे स्टेटमेंट मीडियाने उचलून धरले होते. सोशल मीडियातूनही अंकिताला खूप सपोर्ट मिळत होता आणि त्यावर उलटसुलट चर्वितचर्वण होत होते. अलीकडच्या काळात तिच्या खाजगी जीवनात ती आनंदी दिसल्यामुळे त्याच सोशल मीडियाने ‘तू सुशांत ला विसरलीस’ वगैरे म्हणत तिला ट्रोल केले होते.

Akita Lokhande
अंकिता लोखंडे

छोट्या पडद्यावरील रियालिटी शो ‘बिग बॉस’ हा त्यात होणाऱ्या भांडणांमुळे आणि कॉंट्रोव्हर्सीज मुळे लोकप्रिय आहे. त्याचे मेकर्स या शोसाठी नजीकच्या काळात ‘कॉंट्रोव्हर्सी करून लाइमलाईट’ मध्ये आलेल्या सेलिब्रिटीजना या शोचा भाग करून घेतात. यावर्षीही ‘बिग बॉस’चा नवीन सिझन येऊ घातलाय आणि त्यात कोण कोण असेल याबद्दल प्रेक्षकांमध्ये चर्चाही सुरु असून त्यात मीडिया मीठमसाला टाकतेय. गेल्या वर्षी ‘लाइमलाईट’ मध्ये असलेली अंकिता लोखंडे ‘बिग बॉस’चा हिस्सा होणार आहे असे चर्चिले जाऊ लागले आणि सुशांतला न विसरलेले तिला सोशल मीडियावर ट्रोल करू लागले. तिला हे समजल्यावर अंकिताने सोशल मीडिया वरून सर्वांना कळविले की ती ‘त्या’ शो चा हिस्सा नाही आणि होणार देखील नाहीये.

Akita Lokhande
अंकिता लोखंडे

अंकिता लोखंडेने आपल्या निवेदनात असे लिहिले आहे की, "माझ्या लक्षात आले आहे की मीडियातील काही जण असे अनुमान लावत आहेत की मी यावर्षी बिग बॉसमध्ये भाग घेईन. मी त्यांना आणि सर्वांना सांगू इच्छिते की मी या कार्यक्रमाचा भाग होणार नाही. तसेच लोक मला ‘बिग बॉस’ मधील सहभागासाठी ट्रोल करताहेत आणि मी त्या शोचा हिस्साही नाहीये. ते उगीचच माझ्याबद्दल द्वेष व्यक्त करताहेत. माझ्या बिग बॉस मधील सहभागाच्या अफवा निराधार आहेत."

Statement by Akita Lokhande
अकिता लोखंडेचे निवेदन

‘अफवा या इंडस्ट्रीचा भाग आहेत. खरंतर जे माझ्याबद्दल लिहीत आहेत त्यांनी कन्फर्म करून जबाबदारीने लिहायला हवं. अफवांबद्दल सांगायचं तर मी काही प्रत्येक घरी जाऊन ‘हे खोटं आहे’ असं सांगत फिरू शकत नाही. तुम्ही मला ओळखतंच नाही तर माझ्याबद्दल लिहिण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? त्यामुळे ट्रोलिंग वगैरे फारसं लक्ष देण्यासारखं क्षेत्र नाहीये’, अंकिता लोखंडेने आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांच्याशी गप्पा मारताना सांगितले.

Akita Lokhande
अंकिता लोखंडे

अंकिता लोखंडेने पवित्र रिश्ता या लोकप्रिय टेलिव्हिजन मालिकेत महाराष्ट्रीयन मुलगी अर्चनाची भूमिका साकारली होती जी प्रचंड लोकप्रिय झाली होती. अंकिताने तीन-चार वर्षांच्या ‘गॅप’ नंतर कंगना रनौतच्या मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने बागी ३ मध्ये देखील महत्वपूर्ण भूमिका साकारली होती, ज्यात टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर, रितेश देशमुख यांच्या भूमिका होत्या. अंकिता काही प्रोजेक्ट्सवर काम करीत असून त्याबद्दल लवकरच समजेल.

हेही वाचा -'रश्मिका'साठी फॅनची 900 किमी वारी: भेटी लागे जीवा 'मंदाना'ची आस, 'रश्मिका'साठी कायपण..!!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.