मुंबई- ज्या म्युझिक रियालिटी शोमध्ये एक स्पर्धक म्हणून आली होती ती नेहा कक्कर आता त्याच शोमध्ये जजच्या खुर्चीवर बसली आहे. इंडियन आयडॉल अनेक नवीन गायकांना आपले टॅलेंट प्रेक्षकांसमोर ठेवण्याची संधी देतो. याच शोमुळे नेहा संगीतक्षेत्रात उच्च पदावर पोहोचलीय. ती त्याबद्दल कृतज्ञ तर आहेच परंतु आपल्या अनुभवाचा फायदा याच शोला मिळायला हवा असे तिला मनापासून वाटते आणि म्हणूनच नेहाने जाहीर करून टाकलंय की, ‘इंडियन आयडॉल खेरीज मी इतर कोणताही रियालिटी शो करणार नाही.
होळीचा सण साजरा
इंडियन आयडॉलच्या स्पर्धकांनी परिक्षकांसमवेत होळीचा सण साजरा केला. सर्व स्पर्धकांनी सुरेल गाणी सादर केली व त्यांना प्रत्येक परिक्षकाने साथ दिली. या होळी विशेष भागात मनोरंजनाचा रंगीबेरंगी डोस तर होतेच परंतू स्पर्धकांचे परीक्षकांसोबतचे जॅमिंग कार्यक्रमाची लज्जत वाढविणारे होते. सोशल मीडिया क्वीन नेहा कक्कर ने निहाल आणि पवनदीप सोबत ‘नैना’, ‘प्यार दो प्यार लो’ आणि ‘बदरी की दुल्हनिया’ या गाण्यांवर परफॉर्मन्स दिला. या परफॉर्मन्सने सगळ्यांनाच त्यांच्यासोबत ठेका धरायला भाग पाडले. परीक्षकांनी उभे राहून, टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केले. संपूर्ण वातावरण रोमांचक होऊन गेले. या परफॉर्मन्सनंतर नेहा कक्करने सांगितले की निहाल आणि पवनदीप यांच्यासोबत परफॉर्म करताना तिच्या मनातून धाकधूक होती. तिचा नवरा रोहनप्रीत याने तिला धीर आणि आत्मविश्वास दिला आणि त्यामुळे तिने दणक्यात परफॉर्म केले.
हेही वाचा- मुंबईत कोरोनाचा कहर, आज 6123 कोरोनाबाधितांची नोंद
इंडियन आयडॉलच्या प्रसारणाच्या वेळेत बदली
नेहा म्हणाली, “इंडियन आयडॉल माझ्यासाठी खूप खास आहे आणि मी अगदी मनःपूर्वक या कार्यक्रमाचे श्रेय मान्य करते. इंडियन आयडॉल शिवाय अन्य कुठलाही रियालिटी शो मी करणार नाही. या कार्यक्रमाच्या टीमने खूप कष्ट घेऊन हा शो उभा केला आहे, त्यामुळेच तो अनन्य ठरतो आणि रियालिटी शोजच्या इतिहासातला हा एक आगळावेगळा म्युझिक शो आहे. गेल्या ४ महिन्यांपासून रसिकांचे मनोरंजन करत असलेल्या सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल १२ च्या प्रसारणाची वेळ आता बदलली आहे. त्यातील मस्ती, सुरेल संगीत आणि मनोरंजन तसेच राहणार आहे. इंडियन आयडॉल १२ दर शनिवारी आणि रविवारी रात्री ९.३० वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होतो.
हेही वाचा- टाळ्या-थाळ्या वाजवणं, दिवे लावणं, हे कोरोना योद्ध्यांच्या हृदयाला स्पर्शून गेलं - मोदी