ETV Bharat / sitara

'मिर्झापूर २' मधील गोलूबद्दल वाईट वाटते - श्वेता त्रिपाठी

author img

By

Published : Oct 27, 2020, 7:35 PM IST

मिर्झापूर २ ही वेब सिरीज २३ ऑक्टोबरला रिलीज झाली. याला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. या सिरीजमध्ये श्वेता त्रिपाठीला हिंसक दाखवण्यात आले आहे. या सिझनमधील गोलूची भूमिका करण्याबद्दल तिला काय वाटते हे श्वेताने सांगितले आहे.

Shweta Tripathi
श्वेता त्रिपाठी

मुंबई - ‘मिर्झापूर’च्या दुसर्‍या सिझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. मालिका आता रिलीज झाल्यानंतरही याला संमिश्र प्रतिसाद मिळत असला तरी लोकांमध्ये उत्साह अजूनही कायम आहे. कलाकारांनी कथेतल्या पात्रांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

मालिकेत गजगामिनी गुप्ता उर्फ ​​गोलू या व्यक्तिरेखेची खूप चर्चा आहे. ही भूमिका साकारणारी अभिनेत्री श्वेता त्रिपाठीला तिच्या भूमिकेतील बदलांविषयी विचारले होते. ती म्हणाली, "आम्ही कधीकधी आपल्या आयुष्यात अशा टप्प्यावर पोहोचतो जिथे आपल्याला दोनपैकी एकच गोष्ट निवडायची असते, तेव्हा गोलूलादेखील एकच पर्याय होता. तो म्हणजे सूड घेणे. सूड न घेतल्यास सूड उगवणार होता. गोलूला बंदूक धरुन इतका आनंद होत नसला तरी स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी अजूनही हे सर्व करावे लागत आहे. मला या सिझनमधील गोलूबद्दल वाईट वाटते, कारण तिचे लक्ष फक्त बदला घेण्यावर आहे आणि तिची परिस्थिती समजून घेण्यासारखे कोणीही नाही. "

मालिकेची कहाणी गुंफलेले लेखक पुनीत कृष्णा म्हणाले, “एखादी कथा बंद खोलीत किंवा तिच्या निर्मितीच्या काळात लिहित असताना असे कधीच वाटले नव्हते की ही मालिका इतकी हिट ठरेल.''

सीझन २ मधील पात्रांच्या वर्णनातील सुसंगतता त्याने कशी कायम ठेवली यावर पुनीत कृष्णा म्हणाले, “दुसऱ्या भागातील पात्रे लिहिताना, आम्ही फक्त कथेकडे पाहिले. कथा योग्य पध्दतीने पुढे सरकावी यासाठी कोणत्याही पात्राबाबत पक्षपातीपणा होणार नाही याची काळजी घेतली.''

शूटिंगदरम्यान आलेल्या अनुभवांबद्दल बोलताना मालिका दिग्दर्शक गुरमीतसिंग म्हणाले की, “पहिल्या भागात काम केल्यामुळे आम्हा सर्वांच्यामध्ये एक चांगले बाँडिंग तयार झाले होते. उन्हाळ्याच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर मित्र एकमेकांना भेटत असल्यासारखे वाटले. सेटवर आम्ही खूप मजा केली. "

जवळपास दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 23 ऑक्टोबर 2020 रोजी अमेझॉन ओरिजिनल्सवर रिलीज झालेल्या मिर्झापूर २ मध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्येंदू, श्वेता त्रिपाठी, हर्षिता गौर, रसिका दुगल, अमित सियाल, विजय वर्मा, शिभा चड्ढा, राजेश तेलंग आणि कुलभूषण खरबंदासारख्या कलाकारांनी काम केले. पुनीत कृष्णा लिखित आणि गुरमीतसिंग आणि मिहिर देसाई दिग्दर्शित मिर्झापूर २ ही मालिका एक्सेल मीडिया एन्टरटेन्मेंट या बॅनरखाली तयार झाली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.