मुंबई - अभिनेत्री स्नेहा उल्लाल हिने २००५ला बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी ती खूप चर्चेत आली होती. ती केवळ सलमान खानसोबत पदार्पण करतेय म्हणून चर्चेत नव्हती तर, तिचा चेहरा ऐश्वर्या राय बच्चनसारखा दिसत असल्यामुळे चर्चेला उधाण आले होते.
अभिनेत्री स्नेहा उल्लाने म्हटलंय, ''मी माझ्या रुपाबाबत समाधानी असून कोणत्याही प्रकारच्या तुलनेचा मला त्रास होत नाही. याशिवाय, माझे वर्णन कसे करायचे हे त्यांचे पब्लिसिटीचे धोरण होते. त्या गोष्टीमुळे खरेतर तुलनेवर जोर देण्यात आला होता. नाहीतर, ही इतकी मोठी गोष्ट नव्हती.''
स्नेहाला अजूनही वाटते की, तिने युवावस्थेतच स्वतःला प्रशिक्षित करण्यासाठी वेळ दिला पाहिजे होता.
ती म्हणाली, "मला आयुष्यात पश्चाताप झालेला नाही, परंतु मला वाटते की मी माझ्या करियरची सुरुवात खूप लवकर केली होती. मी प्रतीक्षा केली असी तर, कदाचित मी स्वतःला चांगले प्रशिक्षित केले असते किंवा याचे महत्त्व चांगले समजू शकले असते."
ती आता 15 वर्षानंतर झी 5 च्या 'एक्स्पायरी डेट' या थ्रिलर शोसह डिजिटल डेब्यू करण्यास तयार आहे. ही दोन जोडप्यांची कथा आहे, ज्यात विवाहबाह्य संबंध दाखवण्यात आले आहेत.
स्नेहा म्हणाली, "शूटिंग सुरू करण्यापूर्वी मी थोडी घाबरले होते, कारण मी बर्याच दिवसांनंतर अभिनय करत होते आणि माझ्यासाठी हे नवीन माध्यम होते. पण जेव्हा मी सेटवर आले, तेव्हा ते सर्व विचार नाहीसे झाले. मी माझा सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला आहे. "