ETV Bharat / sitara

'सुपर ३०' ने हृतिकच्या या चित्रपटांना टाकले मागे, पहिल्याच आठवड्यात जमवला 'इतक्या' कोटीचा गल्ला - war

पहिल्याच आठवड्यात 'सुपर ३०' ला मिळालेल्या यशामुळे दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाला चांगले यश मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आता वर्ल्डकप स्पर्धा देखील संपली आहे. त्यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांचा आणखी प्रतिसाद मिळेल, असे बोलले जात आहे.

'सुपर ३०' ने हृतिकच्या या चित्रपटांना टाकले मागे, पहिल्याच आठवड्यात जमवला 'इतक्या' कोटीचा गल्ला
author img

By

Published : Jul 15, 2019, 5:45 PM IST

मुंबई - अभिनेता हृतिक रोशनचा 'सुपर ३०' चित्रपट १२ जुलैला पडद्यावर झळकला. पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरुन प्रतिसाद द्यायला सुरुवात केली आहे. या चित्रपटात हृतिकने गणितज्ञ आनंद कुमार यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याच्या या भूमिकेचेदेखील कौतुक होत आहे. पहिल्याच आठवड्यात 'सुपर ३०'ने बॉक्स ऑफिसवर अर्धशतकाचा टप्पा पार केलाय.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाच्या तीनही दिवसांच्या कमाईचे आकडे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शुक्रवारी या चित्रपटाने ११.८३ कोटीची कमाई केली. शनिवारी १८.१९ कोटी तर, तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी २०.७४ कोटींची कमाई करत आत्तापर्यंत ५०.७६ कोटींची कमाई केली आहे.

  • #Super30 has an excellent weekend... Performed exceptionally well at multiplexes of metros and Tier-2 cities, while mass circuits also saw a healthy trend... Fri 11.83 cr, Sat 18.19 cr, Sun 20.74 cr. Total: ₹ 50.76 cr. India biz.

    — taran adarsh (@taran_adarsh) July 15, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पहिल्याच आठवड्यात 'सुपर ३०' ला मिळालेल्या यशामुळे दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाला चांगले यश मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आता वर्ल्डकप स्पर्धा देखील संपली आहे. त्यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांचा आणखी प्रतिसाद मिळेल, असे बोलले जात आहे.

हृतिकच्या 'मोहेंजोदडो' आणि 'काबिल' चित्रपटालाही 'सुपर ३०'ने मागे टाकले आहे. या चित्रपटात हृतिकची नेहमीपेक्षा वेगळी भूमिका पाहायला मिळते.

  • #Super30 now depends on weekdays to consolidate its status... Growth on Sat and Sun gives the film a chance at metros and Tier-2 cities specifically... #Super30 trending is far, far better than Hrithik's last two films - #MohenjoDaro and #Kaabil.

कोण आहेत आनंद कुमार

आनंद कुमार हे 'सुपर ३०' नावाच्या एका संस्थेचे संस्थापक आहेत. तसेच ते या संस्थेत आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देतात. बिहारमधील ते प्रसिद्ध गणितज्ञ आहेत. या चित्रपटात त्यांचा प्रेरणादायी प्रवास दाखवण्यात आला आहे.

'सुपर ३०'मध्ये हृतिकसोबत अभिनेत्री मृणाल ठाकुर हिने भूमिका साकारली आहे. मृणालने तिच्या अभिनयाची सुरुवात टीव्ही माध्यमातून केली होती. 'कुमकुम भाग्य' मालिकेतील तिचे 'बुलबुल'चे पात्र घराघरात लोकप्रिय झाले होते.

हृतिक 'सुपर ३०'नंतर आता टायगर श्रॉफसोबत 'वॉर' चित्रपटात दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात टायगर आणि हृतिकची जुगलबंदी पाहायला मिळणार असल्याने चाहत्यांना या चित्रपटाची आतुरता आहे. २ ऑक्टोंबर २०१९ ला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.