ETV Bharat / sitara

रितिका श्रोत्री आणि विनायक माळी यांचा युथफूल, कलरफूल आणि रोमँटिक कॉमेडी चित्रपट, ‘मॅड’! - विनायक माळी यांचा कॉमेडी चित्रपट, ‘मॅड

डार्लिंग ह्या बहुचर्चित चित्रपटाची टीम तितक्याच उत्साहात ‘मॅड’ हा रोमॅंटिक कॉमेडी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या मनोरंजनसाठी सज्ज झाली आहे. भिनेत्री रितिका श्रोत्री आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केलेला विनायक माळी ऊर्फ दादूस यांची रोमँटिक सफर 'मॅड’ या चित्रपटातून अनुभवता येणार आहे. २०२२ मध्ये हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.

कॉमेडी चित्रपट, ‘मॅड’!
कॉमेडी चित्रपट, ‘मॅड’!
author img

By

Published : Sep 11, 2021, 7:31 PM IST

मराठी चित्रपटांत आशयघनतेबरोबरच ‘मॅड’ कॉमेडीची सुद्धा चलती आहे. कॉमेडी चित्रपटांना पूर्वीपासूनच प्रेक्षक पाठिंबा देत आले असून आधुनिक काळात तरुण दिग्दर्शकांबरोबर तरुण कलाकारांची फळीदेखील ‘मॅड’ विनोदाने प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहेत. युथ अर्थात तरुणाई या शब्दातच एक वेगळी एनर्जी आहे, ऊर्जा आहे. तारुण्यात एक वेगळाच मॅडनेस प्रत्येकात भरलेला असतो. या मॅडनेसमधूनच कधी कधी कल्पनेपलीकडच्या अतर्क्य गोष्टी घडत असतात. असाच अतर्क्य असलेला ‘मॅड’ हा युथफूल, कलरफूल आणि रोमँटिक कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येतोय.

कॉमेडी चित्रपट, ‘मॅड’!
कॉमेडी चित्रपट, ‘मॅड’!

डार्लिंग ह्या बहुचर्चित चित्रपटाची टीम तितक्याच उत्साहात ‘मॅड’ हा रोमॅंटिक कॉमेडी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या मनोरंजनसाठी सज्ज झाली आहे. समीर आशा पाटील पिक्चर्स आणि कथाकार मोशन पिक्चर्स यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. समीर आशा पाटील आणि व्ही. जे. शलाका हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

या चित्रपटाच्या निमित्ताने हटके आणि फ्रेश जोड़ी प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. अल्पावधीतच आपल्या उत्तम अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री रितिका श्रोत्री आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केलेला विनायक माळी ऊर्फ दादूस यांची रोमँटिक सफर 'मॅड’ या चित्रपटातून अनुभवता येणार आहे. विनायक माळी वेगळ्याच अतरंगी अंदाजात ह्या चित्रपटातून रूपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. ठसकेबाज लव्हेबल रितिका श्रोत्री आणि अतरंगी विनायक माळी हे भन्नाट समीकरण चित्रपटाची रंगत चांगलीच वाढवतील हे नक्की.

कॉमेडी चित्रपट, ‘मॅड’!
कॉमेडी चित्रपट, ‘मॅड’!

मॅडनेस जगण्यात एक कैफ असतो. हा मॅडनेस तुम्हाला काही मिळवून देऊ शकतो किंवा गोत्यात ही आणू शकतो. वेडेपणाची हीच तुफानी झिंग घेऊन लेखक समीर आशा पाटील आणि दिग्दर्शक निखिल वि. खजिनदार प्रेक्षकांना ‘मॅड’ करायला सज्ज झाले आहेत. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या मोशन पोस्टरमधून त्यांच्या अफाट मॅडनेसची कल्पना येते.

रितिका श्रोत्री आणि विनायक माळी यांच्या या मॅडनेसची ‘मॅड’ रोलर कोस्टर राइड प्रेक्षकांसाठी मजेशीर असणार आहे. २०२२ मध्ये हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.

हेही वाचा - मोहित रैनाने आपल्या डॉक्टर वडिलांसोबत सर्व फ्रंटलाइन वर्कर्सना केला सलाम!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.