ETV Bharat / sitara

'प्रेम हे कधीच तिरस्कारात बदलत नाही', एक्स वाईफ सुझानसोबतच्या नात्यावर हृतिकने दिली प्रतिक्रिया - beautiful relationship

हृतिक आणि सुझानचे मार्ग जरी वेगळे झाले असले, तरीही ते एकमेकांना आधार देताना दिसतात.

'प्रेम हे कधीच तिरस्कारात बदलत नाही', एक्स वाईफ सुझानसोबतच्या नात्यावर हृतिकने दिली प्रतिक्रिया
author img

By

Published : Jul 5, 2019, 12:29 PM IST

मुंबई - अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान यांचे कपल एकेकाळी कपल गोल मानले जात असे. मात्र, अनेक वर्षाच्या नात्यानंतर दोघांनीही घटस्फोटाचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयामुळे चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता. पण, घटस्फोटानंतरही सुझान आणि हृतिक दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यांच्या मुलांसोबत ते दोघेही एकत्र वेळ घालवताना दिसतात. अलिकडेच हृतिकने त्याच्या आणि सुझानच्या नात्याबद्दल संवाद साधला.

एका माध्यमाच्या मुलाखतीत हृतिकने म्हटले, की 'सुझान आणि माझं नातं खूप सुंदर आहे. माझ्या मुलांशी असो किंवा आमच्या सर्वाँशी, आम्ही एकमेकांच्या मित्राप्रमाणे राहतो. एक गोष्ट नक्की आहे, की प्रेम कधीही तिरस्कारात बदलत नाही. जर, ते तिरस्कारात बदलत असेल, तर ते प्रेमच नसेल. एकदा ही गोष्ट तुम्ही समजली तर, प्रेम शोधण्याचे रस्ते तुम्हाला आपोआप सापडतील'.

हृतिक आणि सुझानचे मार्ग जरी वेगळे झाले असले, तरीही ते एकमेकांना आधार देताना दिसतात. अलिकडेच हृतिकची बहीण सुनैनाने रोशन कुटुंबावर मारहाणीचे आरोप केले होते. त्यावेळीही सुझान हृतिकच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिली. दोघांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्या दोघांनी पुन्हा एकदा एकत्र यावे, अशी चाहत्यांची इच्छा आहे. मात्र, हृतिक आणि सुझान याबाबत काय निर्णय घेतात, हे त्यांच्यावरच अवलंबून आहे.

हृतिक लवकरच 'सुपर -३०' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पुढच्या आठवड्यात हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Intro:Body:

Entertainment

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.