ETV Bharat / sitara

'होम मिनिस्टर घरच्या घरी'.. तमाम वहिनींना 'प्ले फ्रॉम होम' प्रकारात पैठणी जिंकण्याची देणार संधी - होम मिनिस्टर घरच्या घरी या शोमध्ये आदेश बांदेकर

होम मिनिस्टर घरच्या घरी या शोमध्ये आदेश बांदेकर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग संपर्क साधणार आहेत आणि प्रश्न विचारणार आहेत. लॉकडाऊन कधी संपेल हे सांगता येत नाही; मात्र अशा वेळी हा कार्यक्रम घरबसल्या महिलांना पैठणी जिंकण्याची संधी देणार आहे.

Home Minister Gharchya Ghari
होम मिनिस्टर घरच्या घरी
author img

By

Published : Jun 12, 2020, 4:38 PM IST

‘झी मराठी’वाहिनीवरील ‘होम मिनिस्टर’ आणि आदेश बांदेकर हे समीकरण झाले आहे. तर आदेशभावोजी हे अल्पावधीतच प्रत्येक मराठी कुटुंबातील सदस्य बनले आहेत. सध्या लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू झाला आहे. लॉकडाऊन कधी संपेल हे सांगता येत नाही; मात्र अशा वेळी हा कार्यक्रम घरबसल्या महिलांना पैठणी जिंकण्याची संधी देणार आहे.

होम मिनिस्टर घरच्या घरी हा कार्यक्रम ८ जून पासून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. यात आदेश बांदेकर व्हिडिओ कॉलद्वारे प्रेक्षकांशी संपर्क साधणार आहेत. 'वर्फ फ्रॉम होम' या प्रकारात कार्यक्रमाचं शूटिंग सुरू झालं आहे. केवळ १३ भागांसाठी सुरु झालेल्या होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी आदेश बांदेकर यांच्यावर देण्यात आली आणि तेरा भागांसाठी सुरू झालेल्या ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाने सोळा वर्षांचा टप्पा पूर्ण केला. या कार्यक्रमामुळे तमाम वहिनीसाहेबांचे आदेश बांदेकर हे लाडके भावोजी ठरले. सध्या चित्रीकरण बंद असल्यामुळे काही जुने भाग या कार्यक्रमाचे दाखवण्यात येत होते. परंतु आता 'वर्क फ्राम होम' या प्रकारात चित्रीकरण सुरू झाले आहे.

आदेश बांदेकर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधणार आहेत आणि प्रश्न विचारणार आहेत.याबाबत आदेश बांदेकर म्हणाले की, "एका वेळेला फक्त एकाच कुटुंबामध्ये जाता येत होते. आता लॉकडाऊनमुळे कुटुंबाच्या अनेक सदस्यांना भेटता येत आहे. आता सगळे आपापल्या घरात आहेत. आता मी माझ्या घरातून थेट सगळ्या घरात फिरून येत आहे. सध्या सगळीकडे नकारात्मक वातावरण आहे. अशा अवस्थेमध्ये होम मिनिस्टर सगळीकडे आनंद पसरविणार आहे."

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.