मुंबई - पॉप स्टार लेडी गागाचा बहुप्रतीक्षित क्रोमॅटीका अल्बम 29 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 34 वर्षीय सिंगरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबद्दलची घोषणा केली आहे. हा प्रवास सुरु झाला आहे. तुम्ही 29 मे रोजी अधिकृतरित्या क्रॉमेटीका जॉईन करु शकता, असं तिनं म्हटलं आहे. आपला एक फोटो शेअर करत तिनं याबद्दलची माहिती दिली आहे.
याआधी 10 एप्रिलला याचे सोळा ट्रॅक प्रदर्शित करण्यात येणार होते. मात्र, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लेडी गागाने ही तारीख पुढे ढकलली. क्रॉमेटीकासाठी गागाने म्यूझिक स्टार इल्टॉन जॉन, गायिका अरियाना ग्रान्डे आणि के पॉप ग्रुप यांना एकत्र घेऊन हा अल्बम तयार केला आहे.
गागाने ग्रँडे आणि जॉनला रेन ऑन मी गाण्यासाठी निवडलं तर साऊथ कोरियन गर्ल ग्रुपने सोर कॅन्डी गाणं तयार केलं. क्रोमॅटीका हा गागाचा सहावा अल्बम आहे. 2019 मध्ये तिला आपल्या साऊंड ट्रॅकसाठी ऑस्कर पुस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.