'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील 'राणादा'ची भूमिका साकारलेला अभिनेता हार्दिक जोशी (Hardik Joshi ) प्रत्येक मराठी घरात परिचीत आहे. झी मराठीवरील ही मालिका बंद झाल्याने अनेकांना रोज राणादाला पाहायची सवय बदलावी लागली. परंतु तो पुन्हा मालिकेमध्ये झळकेल हा आत्मविश्वास चाहत्यांच्या मनात कायम आहे. आता प्रेक्षकांची ही इच्छा सफल होताना दिसत आहे. 'राणादा' अर्थात हार्दिक जोशीची नवी मालिका येत आहे.
‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं असं’ या सिरियलचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या मालिकेत अभिनेत्री अमृता पवार (Amrita Pawar ) प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या प्रोमोमध्ये अभिनेत्री अमृता पवार हिला प्रेक्षकांनी बघितले. या सिरियलमधील मग नायक कोण आहे, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिलेली होती.
तर थोडक्यात झी मराठी वाहिनीवर 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' (Tuzya Mazya Sansarala Aani Kay Hav) या मालिकेतून हार्दिक प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीस येत आहे. त्यामुळे प्रेक्षकांची हार्दिकला पाहण्याची इच्छा पूर्ण होणार आहे. या मालिकेत त्याचे काय नाव असेल याची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली आहे.
३० ऑगस्टपासून रात्री ९ वाजता ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येत आहे.
हेही वाचा - अमृता पवार म्हणाली, “‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’चे कथानक खूपच रिलेटेबल''