ETV Bharat / sitara

दिन दिन दिवाळी : गोधनाची पूजा हीच दिवाळीची समृध्द परंपरा - rich tradition of Diwali

दिवाळी हा सण कृषी संस्कृतीतला सर्वात आनंदाचा सण. दिवाळी सणाबाबतीतल्या अनेक प्रथा आणि परंपरा आपल्याला पाहायला मिळतात. देशभर अनेक पध्दतीने हा सण साजरा होता. मात्र सर्वत्र एक गोष्ट पाहायला मिळते ती म्हणजे दिवाळीत होणारी गोधनाची पूजा.

गोधनाची पूजा हीच दिवाळीची समृध्द परंपरा
गोधनाची पूजा हीच दिवाळीची समृध्द परंपरा
author img

By

Published : Nov 1, 2021, 5:36 PM IST

दिवाळी हा सण कृषी संस्कृतीतला सर्वात आनंदाचा सण. शेतीतले पीक खळ्यावरुन घराघरात पोहोचल्यानंतर, समृध्दीचा हा क्षण आनंदात साजरा करण्यासाठी दिवाळीचे अनन्यासाधारण महत्त्व आहे. दिवाळी सणाबाबतीतल्या अनेक प्रथा आणि परंपरा आपल्याला पाहायला मिळतात. देशभर अनेक पध्दतीने हा सण साजरा होता. मात्र सर्वत्र एक गोष्ट पाहायला मिळते ती म्हणजे दिवाळीत होणारी गोधनाची पूजा.

'दिन दिन दिवाळी, गाई-म्हशी ओवाळी

गाई-म्हशी कुणाच्या, लक्ष्मणाच्या

लक्ष्मण कुणाचा, आई-बापाचा

दे माई खोबऱ्याची वाटी

वाघाच्या पाठीत घालीन काठी...'

असं म्हणत गायी म्हशींना ओवाळले जाते. आता वरील गाणे हे एक लोकगीत आहे. गोठ्यात असलेल्या सर्व गोधनाची पूजा करुन त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. दिवाळी ही गायी म्हशी ओवाळण्यासाठी असते हे इथे अधिक अधोरेखीत होते. आता या गायी म्हशींचे रक्षण गुराखी करीत असतात. त्यांना कोणताही धोका होऊ नये यासाठी हे गुराखी दक्ष असतात. रानावनात फिरताना या गायी म्हशींना वाघांसारख्या जनावरांचा धोका असतो. तर या अशा वाघांच्या पाठीत काठी घालण्याचे काम हे गुराखी करतात. म्हणून गुराखीच्या रुपात लक्ष्मण या लोकगीतात आपल्याला पाहायला मिळतो.

केवळ गायी म्हशींचे नाही तर शेळ्या मेंढ्या, बैल आणि इतर पाळीव जनावरे जे माणसाच्या समृध्दीसाठी झटतात त्या सर्वांची पूजा दिवाळीच्या निमित्ताने केली जाते. शहरात दिन दिन दिवाळीचे सूर ऐकायला मिळत नसले तरी आजही कृषी संस्कृती जपल्या जात असलेल्या खेड्यात ही मनोभावे केली जाणारी पूजा आहे.

गाई म्हशींना रान फुलांचा हार घातला जातो, कुंकू लावले जात आणि लव्हाळीच्या काड्यामध्ये कणकीचा दिवा लावून ओवाळणी करण्यात येते. नैवद्य दाखवला जातो आणि हाच नैवद्य गुरा ढोरांना चारलाही जातो.

ग्रामीण भागात आजही ही परंपरा कायम आहे. दिवाळीच्या सणात आज अनेक बदल झाले असले तरी परंपरागत साजरी केली जाणारी गोधनाची ही पूजा आजही कायम आहे.

हेही वाचा - पंतप्रधान मोदी आजपासून दोन दिवसीय ब्रिटन दौऱ्यावर.. दिवाळीची सुरूवात अन् अभिनेत्री ऐश्वर्या रायचा वाढदिवस, वाचा ईटीव्ही भारत टॉप न्यूज

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.